Pune Crime News | भांडणे झाली तर स्वरंक्षणासाठी शस्त्र बाळगणार्‍या तरुणाकडून गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने पिस्टल व 2 राऊंड केले जप्त

Pune Crime News | Crime Branch Unit 4 team seizes pistol and 2 rounds from youth who was carrying a weapon for self-defense in case of a fight

पुणे : Pune Crime News | सोसायटीमध्ये दुसर्‍यांची भांडणे झाली होती आपली भांडणे झाली तर स्वरंक्षणार्थ शस्त्र हवे, यासाठी एका तरुणाने रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल घेतले होते पोलिसांना याची खबर मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने त्या तरुणाला पकडून एक गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

आदित्य अमोल ढसाळ Aditya Amol Dhasal (वय २२, रा़ वेदांत सोसायटी, झेड कॉर्नर, मांजरी) असे या तरुणाचे नाव आहे़

महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलीस पथक चंदननगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांना बातमीदाराने सांगितले की, मांजरी येथील वेदांत सोसायटी येथे एक जण थांबला असून त्याच्याकडे गावठी पिस्टल आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना ही बातमी कळवून पोलीस पथक मांजरी येथील वेदांत सोसायटीजवळ गेले. तेथे थांबलेल्या आदित्य ढसाळ याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटमध्ये खोचलेले गावठी बनावटीचे पिस्टल व मॅगझीनमध्ये २ जिवंत काडतुसे असा ५२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, त्यांची वादय विक्रीची दोन दुकाने आहेत. त्यांच्या सोसायटीमध्ये दुसर्‍या दोघांमध्ये भांडणे झाली होती. त्यामुळे आपली भांडणे झाली तर आपल्या  स्वरंक्षणासाठी  काही शस्त्र असावे, असे वाटून त्याने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून हे पिस्टल खरेदी केले होते. पोलिसांनी आदित्य ढसाळ याच्यावर मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अधिक तपासासाठी त्याला मांजरी पोलिसांच्या हवाली केले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेतला जात आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलीस फौजदार प्रविण राजपुत, एकनाथ जोशी पोलीस हवालदार तुषार खराडे, किशोर दुशिंग, संजय आढारी, विनोद महाजन, सुभाष आव्हाळ, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, विशाल इथापे, मयुरी नलावडे यांनी केली आहे.

You may have missed