Pune Crime News | गांजा विक्री करणार्‍या तस्करी करणार्‍या चौघांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट 7 च्या पथकाने जप्त केला 19 लाखांचा 72 किलो गांजा

Pune Crime News | Crime Branch Unit 7 team arrested four people involved in selling and smuggling marijuana and seized 72 kg of marijuana worth Rs 19 lakhs.

पुणे : Pune Crime News |  टुरिस्ट टॅक्सीद्वारे गांजाची वाहतूक करणार्‍या तस्कराला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने कारमधील तसेच घरातील असा १९ लाख ९३ हजार रुपयांचा ७२ किलो गांजा आणि कार जप्त केली  आहे.

भिवा कालिदास वाघमोडे Bhiwa Kalidas Waghmode (वय ३६), विष्णु भागवत वाघमोडे Vishnu Bhagwat Waghmode (वय २८, दोघे रा़ धायखिंडी, वाघमोडे वस्ती, ता. करमाळा, जि. सोलापूर), हरि श्रीपती ढवळे Hari Shripati Dhawale (वय ३२, रा. श्रीदेवीचा माळ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मनोज अनिल सुरवसे Manoj Anil Suravase (वय २९, रा. भवानी पेठ, धायखिंडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना गुप्त माहिती मिळाली की, एक पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कारमधून विक्रीसाठी गांजा घेऊन जाणार आहे. त्याप्रमाणे बोल्हाई माता मंदिराच्या  जवळ केसनंद वाडेबोल्हाई रोडलगत टेकडीचे बाजूला मोकळ्या जागेत सापळा रचला. बातमीनुसार कारचा शोध घेऊन कार ताब्यात घेतली. त्यातील चौघांना पकडून कारच्या  डिक्कीची तपासणी केली.  डिक्कीमध्ये चार पोत्यांमध्ये गांजा २९ प्लॅस्टिक बॅगमध्ये गुंडाळलेला आढळून आला. तो ५८ किलो ५८० ग्रॅम आढळून आला. पोलिसांनी चौघांना अटक करुन त्यांच्या विरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

भिवा वाघमोडे याच्या घराची झडती घेतली असता तेथे १४ किलो गांजा आढळून आला. या आरोपींकडून एकूण १९ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा ७२ किलो गांजा व कार जप्त करण्यात आली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, ऋषिकेश ताकवणे, प्रशांत कापुरे, निले साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, नेहा तापकीर, सोनाली नरवडे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

You may have missed