Pune Crime News | भावडी गावातील खाणीशेजारील गावठी दारुची भट्टी गुन्हे शाखेच्या युनिट 7 पथकाने जेसीबी लावून केली उद्धवस्त

Pune Crime News | Crime Branch Unit 7 team demolished a village liquor factory near a mine in Bhavdi village using a JCB

पुणे : Pune Crime News | वाघोली परिसरातील भावडी गावातील हंडगर यांचे खाणी शेजारी उभारलेल्या गावठी दारुची हातभट्टी गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने जेसीबी लावून उद्धवस्त केली. या ठिकाणाहून १ लाख ९६ हजार रुपयांची ५ हजार ६०० लिटर गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन व ४ हजार रुपयांचे लाकडी सरपण पोलिसांनी जप्त केले.

गुन्हे शाखेच्या युनिट ७ चे पथक वाघोली परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भावडी गावाच्या हद्दीतील हंडगर याचे खाणी शेजारी गावठी हातभट्टीची दारु भट्टी लावून तयार करत आहे. या माहितीच्या अनुषंगाने युनिटकडील पोलीस पथकाने तेथे छापा घातला. तेथे ५ हजार ६०० लीटर गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन मिळाले. हातभट्टीची दारु बनविणार्‍या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक याच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे, निर्णय लांडे, विनायक साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नेहा तापकरी, सोनाली नरवडे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.

You may have missed