Pune Crime News | खरेदीखत करुन न देता साडेपाच लाखांची फसवणूक करणार्‍या वकिलावर गुन्हा दाखल

Fraud

पुणे : Pune Crime News | फ्लॅट विकत घेण्यासाठी तसेच फ्लॅटच्या बाबतीत कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी, आवश्यक ती कामे करण्यासाठी ५ लाख ३४ हजार रुपये घेऊन कोणतेही काम न करता फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) एका वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAfSw5Npxq6

अ‍ॅड. अमोल अनंतराव पाटील Adv Amol Anantrao Patil (रा. वारीस बिल्डिंग, एलोरा पॅलेस समोर, सातारा रोड) असे या वकिलाचे नाव आहे. याबाबत फारुख मेहबुब शेख (वय ६२, रा. कोंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार चैत्रबन लेकटाऊनमध्ये ८ एप्रिल २०२४ रोजी घडला होता.

https://www.instagram.com/p/DAfQcajpxPu

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना राहते फ्लॅट विकत घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी अ‍ॅड. अमोल पाटील याला फ्लॅटचे कायदेशीर बाबी हाताळण्याकरीता तसेच सर्च रिपोर्ट काढणे, खरेदीखत करुन देणे या सर्व कामाकरीता विश्वासाने ५ लाख ३४ हजार रुपये दिले होते. परंतु, त्यापैकी कोणतेही काम अ‍ॅड. पाटील याने केले नाही. तसेच पैसे परत मागितले तरी ते न दिल्याने फसवणूकीची फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे (PSI Suresh Shinde) तपास करीत आहेत. (Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAfXN8QpcLA

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)