Pune Crime News | दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा बचक्या टोळीतील सराईत गुन्हेगार जेरबंद
पुणे : Pune Crime News | दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा बचक्या टोळीतील सराईत गुन्हेगाराबाबत गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाला मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी पाहिजे असलेल्या गुन्हेगाराला पकडले.
राजेश ऊर्फ चौपाट्या बबलू मंगल मंडळ (वय २९, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, मुळ रा. दरबंगा, बिहार) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. राजेश मंडळ हा चौपाटी राजा म्हणून कुप्रसिद्ध असून दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मोबाईल चोरी करणारी सराईत बचक्या टोळीशी संबंधित आहे. राजेश मंडळ याच्याविरुद्ध २०११ पासून चोरी, मारामारी, विनयभंग, फसवणुक असे ८ गुन्हे दाखल आहेत. सध्या तो मोक्का गुन्ह्यात जामिनावर होता.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडील पोलीस पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बंडगार्डन पोलीस ठाण्यातील आर्म अॅक्ट गुन्ह्यातील फरार गुन्हेगार राजेश मंडळ हा अंगुर वाईन या ठिकाणी थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कॉप्स २४ मार्शल तुळशीदास जाधव, आणि महेंद्र आगळे, सांगर दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.
