Pune Crime News | शेअर मार्केट गुंतवणुकीत ज्येष्ठ नागरिकाची 22 कोटींची फसवणुक केल्याप्रकरणी पैसे स्वीकारणार्‍या चौघांना सायबर पोलिसांनी ठाणे, छत्रपती संभाजीनगरमधून केले जेरबंद  

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास जादा परतावाच्या आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या सायबर चोरट्यांपैकी पैसे स्वीकारणार्‍या चौघांना छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून अटक केली आहे.

मुनीलकुमार सुरेंद्र सिंह Munilkumar Surendra Singh (वय ५१, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे (Akash Chandrashekhar Marathe), लाला केशव उमाप Lala Keshav Umap (वय २६), परमेश्वर दिलीप दाभाडे Lord Dilip Dabhade (वय २३, तिघे रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यातील ८५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी फिर्याद दिली होती. हे ज्येष्ठ नागरिक मुळचे हरियाना येथील आहेत. पुण्यात त्यांची खासगी कंपनी होती. कंपनी विक्रीतून त्यांना रक्कम मिळाली होती. ही रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली. चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवली. त्यानंतर त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी सायबर चोरटे वापरत असलेल्या ७ बँक खात्यात वेळोवेळी २२ कोटी तीन लाख रुपये जमा केले. त्यांना परतावा मिळाला नाही.


या गुन्ह्याचा तपास केला असता तपासात मिळून आलेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणात दिसून आले की, गुन्ह्यातील फिर्यादी यांची फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी मोठ्या प्रमाणातील रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. ही रक्कम २७ वेगवेगळ्या लोकांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. त्यातून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे, सुशिल डमरे, पोलीस हवालदार रामाणे, हंबीर, मदने, चौकटे, मांढरे, मुंढे, कोंडे, कारकुड, गंगाधर काळे, पोलीस अंमलदार भिंगारे, होळकर, सचिन शिंदे, विजय भोसले, अमदनान शेख यांनी केली आहे.

You may have missed