Pune Crime News | हॉटेल कॉनरॉडच्या मालकाच्या नावाने व्हॉटसअ‍ॅप मेसेज करुन सायबर चोरट्यांनी फायनान्स संचालकांना घातला 20 लाखांचा गंडा

Pune Crime News | Cyber ​​thieves duped finance director of Rs 20 lakhs by sending WhatsApp messages in the name of Hotel Conrad owner

पुणे : Pune Crime News |  बंडगार्डन परिसरातील हॉटेल कॉनरॉडचे मालक संदिप रहेजा यांच्या नावाने व्हॉटसअ‍ॅप मेसेज करुन सायबर चोरट्यांनी हॉटेलच्या फायनान्स संचालकांना २० लाख ९० हजार रुपयांना गंडा घातला.

याबाबत हॉटेल कॉनरॉडचे फायनान्स संचालक बीपलब चक्रबोरती (वय ५४, रा. प्रभात रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही फसवणुकीची घटना ८ जानेवारी २०२६ रोजी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीपलब चक्रबोरती हे हॉटेल कॉनरॉड येथे डायरेक्टर ऑफ फायनान्स म्हणून काम करतात. ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ते मंगलदास रोडवरील हॉटेल कॉनरॉडमध्ये काम करत असताना त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर एका क्रमांकावरुन मेसेज आला. तो मेसेज हॉटेल कॉनरॉड व पाम ग्रुप बिच हॉटेल्स या कंपनीचे मालक संदिप रहेजा यांचा मेसेज असल्याचे दिसून आले. या मेसेजमध्ये म्हटले की बीपलाब मी संदिप रहेजा, हा माझा पर्सनल नंबर आहे. कोणाला शेअर करु नका, सेव्ह करा, “Biplab its me sandeep Raheja , its my very personal number. please don’t share with anyone …. saved it “असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी हॉटेल मालक संदिप रहेजा यांच्या नावाने तो नंबर सेव्ह केला. त्यानंतर लगेज दुसरा मेसेज आला. त्यात आयटीसीकडून काही रक्कम आज आली आहे का, असे विचारण्यात आले. त्यांनी चेक करतो, असे सांगितले. त्यांनी ३५लाख ६१ हजार रुपये येणार होते असे सांगितले. त्यांनी चेक केले. पण अशी रक्कम आली नव्हती. “एक तासांनी चेक करा,” असे संदिप रहेजा यांच्याकडून मेसेज आला. त्यानंतर थोड्या वेळाने संदिप रहेजा यांच्या व्हॉटसअ‍ॅप नंबरवरुन बँक डिटेल्स पाठविले. BENEFICIARY AMAR SINGH ACCOUNT
NUMBER 44409320113 IFSC CODE SBIN 0050119 SBI BANK AMOUNT OF RTGS – 2090601/- TWENTY LAKHS NINTY THOUSAND SIX HUNDERED ONE ONLY अमर सिंगच्या खात्यात २० लाख ९० हजार ६०१ रुपये पाठविण्यास सांगितले. पेमेंट पीजीबीएचपीएल खात्यातून करण्यास सांगितले. Make payment through PGBHPL accounts right now and send me utr number … After my meeting i will provide you all formalities

आपल्याशी कंपनीचे मालक संदिप रहेजा हेच बोलत असल्याचे त्यांना वाटले. त्यांनी कॉल केला, परंतु, त्यांनी ते मिटिंगमध्ये असल्याचे व कॉल करु नको, असे सांगितले. त्याचे नेहमी कस्टमरकडून पैसे येणार असल्याबाबत बोलणे होत असल्याने बीपलब चक्रबोरती यांचा विश्वास बसला. त्यांनी दिलेल्या बँक डिटेल्सप्रमाणे २० लाख ९० हजार ६०१ रुपये पाठविले. रक्कम पाठविल्यानंतर त्या व्हॉटसअ‍ॅप नंबरवर कॉल केला. परंतु, कॉल उचलला नाही. तेव्हा त्यांना शंका निर्माण झाली. त्यांनी कंपनीचे मालक संदिप  रहेजा यांच्या मुंबई येथील कार्यालयात कॉल केला. त्यावेळी त्यांना समजले की, संदिप रहेजा यांनी त्यांना कोणतेही पैसे पाठविण्यास सांगितले नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अ‍ॅक्सीस बँक मॅनेजरला कळविले. तोपर्यंत पैसे एसबीआय बँकेला ट्रान्सफर झाले होते. अ‍ॅक्सीस बॅक मॅनेजरने एसबीआय बँकेला मेलद्वारे कळविले. त्यानंतर त्यांनी १९३० वर तात्काळ ऑनलाईन तक्रार दिली. या तक्रारीची नुकतीच दखल घेऊन कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करुन घेण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके तपास करीत आहेत.

You may have missed