Pune Crime News | ऑनलाईन पुजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी पाच लाखांंना घातला गंडा; सेवानिवृत्त अधिकार्याची केली फसवणूक

पुणे : Pune Crime News | लोकांना फसविण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढविणार्या सायबर चोरट्यांनी आता एक नवा फंडा काढला आहे. लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ऑनलाईन पुजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त अधिकार्याला ५ लाख ३० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वानवडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वेगवेगळ्या देवतांच्या नावाने अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार यापुढे होण्याची शक्यता आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत अरुण वेदप्रकाश सुद (वय ५६, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १७ जून ते ९ जुलै २०२५ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना फेसबुक या सोशल अॅपद्वारे चंचला माता ट्रस्ट चे पेजवरील जाहिरात मिळाली. त्यामधील आरोपीने वापरकर्ता याने फिर्यादी यांना कॉल करुन देवीची पुजा करायची आहे, असे सांगून भक्तांना या पूजेत सहभागी होता येणार असून त्यासाठी काही रक्कम जमा करावी लागेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठविण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी पेपल कस्टमर केअर यावर फोन केला असता त्या मोबाईलवरील आरोपीने पे पल कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करुन फिर्यादी यांच्या मोबाईलमध्ये फाईल डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून एकूण ५ लाख ३० हजार रुपये काढून घेऊन फसवणुक केली. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे अधिक तपास करीत आहेत.