Pune Crime News | जमिनीच्या वादातून भावजयीचा खुन करुन पुण्यात पळून आलेल्या दीराला वारजे माळवाडी पोलिसांनी केली अटक

Pune Crime News | Deera, who fled to Pune after killing brother-in-law over land dispute, arrested by Warje Malwadi police

पुणे : Pune Crime News |  जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथील जमिनीच्या वादातून दारुच्या नशेत भावजयीवर चाकूने वार करुन तिचा खुन करुन पुण्यात पळून आलेल्या दीराला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

तुषार निंबा साबळे Tushar Nimba Sable (रा. निमगिरी, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अरुणा शरद साबळे (वय ३८) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत शरद निंबा साबळे (वय ४२, रा. निमगिरी, ता. जुन्नर) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरद साबळे याच्या वाटणीला आलेल्या जमिनीवर त्यांचा भाऊ तुषार साबळे याने घर बांधल्यावरुन दोघा भावांमध्ये चार महिन्यापूर्वी वाद होऊन भांडणे झाली होती. तसेच जमिनीचे कारणावरुन त्यांच्यात वाद होते. तुषार हा दारु पिऊन आला की त्यांच्याशी व त्यांची पत्नी शारदा साबळे हिच्याशी भांडणे करीत असे.

५ जानेवारी रोजी शरद साबळे हे शेळ्या चारण्यासाठी घेऊन शेताकडे गेले. सायंकाळी मुले शाळेतून घरी आल्यावर तुषार हा शारदा साबळे यांना चाकूने मारहाण करीत असल्याचे पाहिले. मुलांना आल्याचे पाहून तुषार साबळे हा पळून गेला. छाती, हातावर चाकूच्या वारामुळे रक्तस्त्राव होऊन शारदा साबळे यांचा घरातच मृत्यु झाला.

गुन्हा घडल्यापासून तुषार साबळे हा फरार होता. तो वारजे परिसरात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांना कळविली. वारजे परिसरातील यशोदीप चौक येथे सापळा रचण्यात आला. तुषार साबळे तेथे येताच पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा यांनी  झडप घालून त्याला पकडले. जुन्नर पोलिसांना कळविल्यावर त्यांचे एक पथक तातडीने पुण्यात येऊन त्यांनी तुषार साबळे याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ शीतल जानवे -खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, निलेश बडाख यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा, नायकवडे व पोलीस अंमलदार चौधरी यांनी महत्वाची भूमिका बजावली.