Pune Crime News | झोमॅटोची ऑर्डर पोहचविण्यास उशीर केल्याने डिलिव्हरी बॉयला चौघांनी लाकडी बांबुने मारहाण करुन केले जखमी

Pune Crime News | Security guard severely injured after being beaten with a stick for not allowing him to enter the society, incident in Mahamadwadi

पुणे : Pune Crime News | रात्री जेवणाची झोमॅटोची ऑर्डर दिली असतानाही डिलिव्हरीसाठी उशीर झाल्याच्या रागातून चौघांनी डिलिव्हरी  बॉयला लाकडी बांबुने व हाताने मारहाण करुन जखमी केल्याचे प्रकार समोर आला आहे.

याबाबत जुबेर अहमद रशिद शेख (वय ३५, रा. धायरी फाटा) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विकास काशिनाथ धोत्रे (वय २१, रा. साईनगर, कात्रज) व त्याच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव येथील वाघजाई नगरमधील रंगाशेठ चौकात ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. विकास धोत्रे व त्याच्या साथीदारांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्याची डिलेव्हरी करण्यासाठी जुबेर शेख हे वाघजाईनगर येथे गेले. तेव्हा डिलिव्हरी देण्यास उशीर का झाला, यावरून धोत्रे व शेख यांच्यात वादावादी झाली. तेव्हा धोत्रे व त्याच्या साथीदारांनी जुबेर शेख यांना हाताने व लाकडी बांबुने मारहाण करुन जखमी केले. त्याचवेळी आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस मार्शल तेथे पोहचले. पोलिसांना पाहून धोत्रे याचे साथीदार पळून गेले. आंबेगाव पोलिसांनी चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार लोहार तपास करीत आहेत.

You may have missed