Pune Crime News | पुणे : धायरीत तडीपार गुंडाने कोयता उगारुन माजविली दहशत; नांदेड सिटी पोलिसांनी गुंडाच्या आवळल्या मुसक्या

Pune Crime News | Dhayari: Externed Man Held for Allegedly Brandishing Sickle and Threatening Residents; Nanded City Police Make Arrest

पुणे : Pune Crime News | सिंहगड रोडवरील धायरी परिसरात कोयता उगारुन नागरिकांना दहशत माजविणार्‍या तडीपार गुंडाला नांदेडसिटी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ओंकार उर्फ बुट्या संतोष सातपुते Omkar alias Butya Santosh Satpute (वय २२, रा. पारी कंपनी चौक, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.

याबाबत पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपुते हा सराईत गुंड आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच दहशत माजविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ओंकार सातपुते याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून ९ सप्टेंबर २०२५ रोजी २ वर्षासाठी तडीपार केले होते. असे असताना तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन तो धायरी भागात आला. शनिवारी १३ डिसेंबर रोजी  सायंकाळी सातच्या सुमारास त्याने धायरीतील मारुती मंदिर परिसरात नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजविली. सातपुते याने कोयता उगारुन नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातपुते याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.

You may have missed