Pune Crime News | ‘तुला खूप मस्ती आली का, तुला जीवंत सोडणार नाही’ ! जुन्या भांडणाच्या रागातून एकाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून कुल्फीच्या गाडीवर काम करणार्या तरुणाला, तुला खुप मस्ती आली का, तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या २ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
आदित्य काका गायकवाड Aditya Kaka Gaikwad (वय १९, रा. धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत आर्यन रवींद्र लोखंडे (वय १९, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना धनकवडीमधील बालाजीनगर येथील एलोरा पॅलेससमोर ३ डिसेंबर रोजी रात्री सव्वाअकरा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन लोखंडे हा कुल्फी गाडीवर काम करतो. तो कामावर असताना मोटारसायकलवरुन चौघे जण आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांनी लोखंडी कोयता काढून ‘‘तुला खूप मस्ती आली का, तुला जीवंत सोडणार नाही,’’ असे म्हणून शिवीगाळ करु लागले. हे पाहून आर्यन लोखंडे हा घाबरुन पळून जाऊ लागला. तेव्हा त्यांनी आर्यन याला पकडून त्यांच्याकडील कोयत्याने आर्यन याच्या डोक्यात, दोन्ही हातावर, डाव्या पायाच्या मांडीवर, मागील नडगीवर सपासप वार केले़ तसेच पाठीच्या उजव्या हाताच्या खांद्यावर, मागे व मानेवर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहकारनगर पोलिसांनी त्यांच्यातील आदित्य गायकवाड याला अटक केली असुन दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक कर्चे तपास करीत आहेत.
