Pune Crime News | हा हरामखोर खूप माजलाय याला जिवंत सोडू नका ! गुंडाच्या टोळक्याचा तरुणाच्या खूनाचा प्रयत्न

marhan

पुणे : Pune Crime News | दुचाकीवरुन घरी जाणाºया दोघांना अडवून गुंडाच्या टोळक्याने बेदम मारहाण (Marhan) करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी आहेत. (Attempt To Murder)

याप्रकरणी गणेश संजय पोळ (वय १९, रा. खड्डा झोपडपट्टी, ताडीवाला रोड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सौरभ तिमप्पा धनगर (सौर्‍या)(वय ४०), आकाश राहुल पंडित ऊर्फ झिंग्या (वय ३७), साहिल राजू वाघमारे ऊर्फ सोन्या (वय २३, सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. ही घटना ताडीवाला रोड (Tadiwala Road Pune) येथील मारुती मंदिर चौकात सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्याचा मित्र रोहन व त्याचा मुलगा रोनिक यांना घेऊन केस कापण्यासाठी गेले होते. केस कापल्यानंतर दुचाकीवरुन घरी परत येत असताना मारुती मंदिर चौकात आरोपींनी त्यांना अडविले. सोन्या याने रोहन याचा मुलगा रोनिक याला उचलून बाजुला घेतले. व “हा भाडखाऊ खून माजला आहे. मारा या हरामखोराला जिवंत सोडू नका,” असे बोलून शिवीगाळ करु लागला. सौरभ याने खिशातून फायटर काढले. फिर्यादी यांच्या कानावर, हनुवटीवर व कपाळावर मारण्यास सुरुवात केली.

इतरांनी लाकडी बांबुने मारहाण केली. फिर्यादी हे वाचवा वाचवा असे ओरडू लागल्यावर लोक जमा होऊ लागले. तेव्हा सौरभ याने ‘खबरदार, जर कोणी याला वाचविण्यासाठी मध्ये आलात तर तुमच्या जिवाला मुकाल,’ अशी धमकी देऊन दहशत पसरविली. त्यामुळे कोणी पुढे येण्याची हिंमत दाखविली नाही. रोहन याने फिर्यादी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी व रोहन हे त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाऊ लागले. तेव्हा पाठीमागून तिघांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गर्कळ तपास करीत आहेत.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी