Pune Crime News | मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली दरम्यान चोरटयांनी साधला डाव ! सारसबाग ते जेधे चौक दरम्यान सोनसाखळी चोरीच्या 5 घटना
पुणे : Pune Crime News | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Rally In Pune) यांची शांतता रॅली रविवारी पुण्यात आली होती. त्यावेळी मराठा कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. सारसबाग ते वसंतदादा पाटील पुतळा, जेधे चौक दरम्यान चोरट्यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविल्या. सोनसाखळी चोरीच्या पाच घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ८ लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
सत्यवान लक्ष्मण जगताप (वय ५१, रा. माळेगाव, ता. बारामती) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र जालिंदर सुरवसे, सुरेंद्र कदम हे मराठा आरक्षण जनजागृती शांतता पदयात्रेत पायी जात असताना जेधे चौक (Jedhe Chowk Pune) ते सारसबाग चौक (Sarasbaug Chowk Pune) दरम्यान रविवारी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
दीपक बापू बांदल (वय ३७, रा. वडाची वाडी, ता. हवेली) हे त्यांचे मित्र अविनाश भराटे, निवृत्ती जाधव, अभिजित माळवदकर हे पदयात्रेत चालत असताना जेधे चौक ते सारसबाग दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
प्रकाश सुरेश सूर्यवंशी (वय ४२, रा. मानाजीनगर, नर्हे) हे व दत्ता तुपे हे पदयात्रेत सहभागी झालेले असताना जेधे चौकात झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी दोघांच्या गळ्यातील ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला.
खिसा कापला
बाळासाहेब ज्ञानेश्वर पिलावरे (वय ५४, रा. खडकमाळ आळी, स्वारगेट) हे अखंड मराठा समाज शांतता रॅलीमध्ये
जाण्यासाठी आले असताना पुरम चौकातील वसंतदादा पाटील पुतळ्याच्या मागे ते उभे होते.
रविवारी सायंकाळी गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ५७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम नकळत चोरुन नेली.
प्रणय लक्ष्मण पळसकर (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) हे रॅलीमध्ये गेले असताना गर्दीत चोरट्यांनी
त्यांच्या गळ्यातील ९२ हजार रुपयांची सोनसाखळी नजर चुकवून चोरुन नेली.
हा प्रकार शनिवार पेठेतील कडबे आळी तालीम चौकात रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत सोनसाखळी चोरीच्या ५ घटनांच्या तक्रारी आतापर्यंत पोलिसांकडे दाखल
करण्यात आल्या असून आणखी तक्रारी पुढे येण्याची शक्यता आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु