Pune Crime News | संरक्षक भिंत पाडून मिळकतीवर केले अतिक्रमण ! बाणेरमधील घटना, तीर्थ स्पेसेसचे विजय रौंदळ यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | बाणेर -म्हाळुंगे रोडवरील (Baner Mahalunge Road) जागेत जेसीबीच्या सहाय्याने संरक्षक भिंत पाडून मिळकतीत जबरदस्तीने व अनधिकृत अतिक्रमण केल्या प्रकरणी तीर्थ स्पेसेसचे मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीर्थ स्पेसेसचे मालक विजय रौंदळ Vijay Raundal (रा. पल्लोड फार्म, बाणेर) आणि साईट सुपर वायझर प्रशांत जाधव (वय ४८, रा. धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी विजया विठ्ठल कोंढरे (वय ६५, रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती विठ्ठल कोंढरे यांनी १५ जुलै १९९१ रोजी खरेदीखताद्वारे बाणेर येथील १२ गुंठे जमीन विकत घेतली होती. विठ्ठल कोंढरे यांचे २०१८ मध्ये निधन झाले. या जागेवर दुकाने बांधली असून ती त्यांनी भाडेतत्वावर दिली आहेत. या जागेत पूर्वी पत्र्याचे शेड होत. तेथे सिमेंट व स्टील विक्रीचे दुकान होते. हे दुकान बंद केल्यावर येथील शेड काढून घेतली होती. ती जागा मोकळी होती.
युनियन बँकेकडून लिलाव प्रक्रियेमध्ये तीर्थ स्पेसेसचे विजय तुकाराम रौंदळ यांनी त्यांच्या शेजारची जागा खरेदी केली होती. २० ऑगस्ट रोजी फिर्यादी यांच्या जागेत असलेली संरक्षक भिंत कोणीतरी पाडत होते. तेव्हा फिर्यादी व त्यांचे नातू तेथे गेले. विजय रौंदळ यांचे साईट सुपरवायझर प्रशांत जाधव यांना कागदपत्रे दाखविल्यावर त्यांनी काम थांबविले व दोन दिवसात मिटिंग ठेवू असे सांगितले. त्यानंतर मिटिंग न घेता २२ ऑगस्ट रोजी फिर्यादीच्या मिळकतीमध्ये असलेले जुने पत्रा शेडचे अँगल तोडण्यात आले. जेसीबी लावून संरक्षक भिंत तोडण्यात आली. फिर्यादी यांनी प्रशांत जाधव याला विचारले असता त्याने विजय रौंदळ यांनी या जागेत बांधकाम करायला सांगितले आहे,
असे म्हणून तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत धमकी दिली.
या जागेला मी पत्र्याचे कंपाऊंड करणार आहे. तुम्ही मध्ये यायचे नाही, असे सांगितले.
फिर्यादी यांनी विजय रौंदळ यांच्याशी फोनवर बोलल्यावर त्यांनी कोंढरे कुटुंब जागेवर आले
तर त्यांना हाकलून द्या असे जाधव यांना सांगितले.
फिर्यादी यांनी विनंती केली तरी त्यांनी काम थांबविले नाही व त्यांच्या प्लॉटवर अतिक्रमण केले.
त्यांची संरक्षक भिंत तोडून नुकसान केले. चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून
पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब झरेकर (PSI Balasaheb Zarekar) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा