Pune Crime News | पुणे : कामावर येत नसल्याने आधी कोयत्याने केले वार, मग कारखाली चिरडून मजुराला संपवलं
पुणे : Pune Crime News | शेतात कामावर न आल्याने शेतमजुरावर (Farm Laborer) कोयत्याने (Koyta) वार करुन जखमी केले. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेत असताना कारने चिरडले. यामध्ये शेतमजूराचा मृत्यू (Death) झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. हा प्रकार खडकवासला धरण परिसरातील मांडवी बुद्रुक गावात घडला. जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भरत लक्ष्मण वाल्हेकर (वय 55, सध्या रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. रोहा, जि. रायगड) असे खून (Pune Murder Case) झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी (Haveli Police Station) संजय हिंदुराव पायगुडे Sanjay Hindurao Paigude (वय 50, रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली) आणि सचिन नथु पायगुडे Sachin Nathu Paigude (वय 45, रा. मांडवी बुद्रुक) या दोघांवर गुन्हा दाखल करुन संजय पायगुडे याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकर दाम्पत्य विलास पायगुडे यांच्या शेतात कामाला होते. पायगुडे याच्या खोलीत ते राहत होते. आरोपी सचिन हा विलास पायगुडेचा पुतण्या आहे. वाल्हेकर दाम्पत्य मागील पाच ते सहा वर्षापासून गावात वास्तव्यास आहे. वाल्हेकर गावातील इतर शेतकऱ्यांकडे काम करत होते. पायगुडे यांच्या शेतावर ते तीन ते चार दिवस कामाला गेले नव्हते. बुधवारी (दि. 3 जुलै) ते दुसऱ्या शेतकऱ्याकडे कामाला जात होते. आरोपी सचिन याने वाल्हेकर दाम्पत्य सोबत वाद घातले. त्याने शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच रागाच्या भरात वाल्हेकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. पत्नीने मध्यस्थी केली असता त्यांना देखील मारहाण केली. (Pune Crime News)
गंभीर जखमी झालेल्या भरत यांना घेऊन त्यांची पत्नी अनुसया बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात उपचारासाठी घेऊन निघाली होती.
त्यावेळी आरोपी सचिन याने वाल्हेकर दाम्पत्याला कारने धडक दिली.
ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत वाल्हेकर दाम्पत्याला ससून रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच भरत वाल्हेकर यांचा मृत्यू झाला.
याची माहिती रुग्णालय प्रशासनाने हवेली पोलिसांना दिली.
पोलिसांनी जखमी अनुसया वाल्हेकर यांचा जबाब नोंदवून दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार (API Sagar Pawar) करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Raigad ACB Trap | बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक
Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!
Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)