Pune Crime News | ऐन दिवाळीमध्ये गोळीबार?, पोलिसांची उडाली धांदल ! गोळीबार नाही तर मारामारी आणि खंडणीचा प्रकार, वाचा सविस्तर

पुणे : Pune Crime News | दिवाळीचा सण सुरु असला तरी पोलिसांना या दिवसात जास्त काम पडते. त्यात विधानसभा निवडणुका असल्याने आणखीच लक्ष घालावे लागते. अशावेळी पोलीस नियंत्रण कक्षातील (Pune Police Control Room) फोन बुधवारी रात्री साडेसात वाजता खणखणतो, म्हात्रे पुलाजवळील (Mhatre Bridge Pune) डी पी रोडवर (DP Road Pune) गोळीबार झाला (Firing In Pune) असून त्यात एक तरुण जखमी झाला असल्याचे फोन करणारा सांगतो. त्याबरोबर संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांपासून अगदी मार्शलपर्यंत फोनच्या अनुषंगाने घटनास्थळावर पोहचतात. सर्वत्र पाहणी करतात. पण, गोळीबार झाल्याचे सांगणारा कोणताच पुरावा दिसून येत नाही. गोळीबार झाल्याचे सांगणारा हा फोन एका अल्पवयीन मुलाने केल्याचे उघड होते. हे समजल्यावर सर्व अधिकार्यांनी नि:श्वास सोडला.
https://www.instagram.com/p/DBx4Oo0JQ_f
तोपर्यंत अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील, अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, अभिजित काळे या पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
पोलिसांनी या मुलाच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. गोळीबार झाला नसला तरी तेथील अंडाभुर्जीच्या गाडीचालकाकडून खंडणी वसुलीचा प्रकार समोर आला. खंडणी न दिल्याने सराईत गुन्हेगाराने मारहाण केली होती. याबाबत अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका १६ वर्षाच्या मुलाने अलंकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव भिंगारे (रा. दत्तवाडी ) व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव भिंगारे हा सराईत गुन्हेगार आहे.
फिर्यादी यांची म्हात्रे पुलाजवळील डी पी रोड वरील फुटपाथवर अंडा भुर्जीची गाडी आहे.
ही अंडा भुर्जीची गाडी चालू ठेवण्यासाठी वैभव भिंगारे
व त्याच्या मित्राने १० हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीच्या आत्येभावाने त्याला विरोध केला.
तेव्हा त्यांनी या आत्येभावास शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरवात केली.
फिर्यादी हे मध्ये पडले असता त्यांनाही या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्याने पँटच्या खिशातून काही तरी काढून त्यांना मारहाण केली.
पोलिसांनी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अभिजित काळे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा