Pune Crime News | रिक्षा वळविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर गोळीबार; कोंढव्यातील घटनेत चार सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | रिक्षा वळविताना झालेल्या वादातून टोळक्याने रिक्षाचालकावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे.
कुणाल उर्फ नन्या जाधव (Kunal alias Nanya Jadhav), आदित्य घावरे, अक्षय ज्ञानेश्वर जावळे Akshay Dnyaneshwar Javale (वय २०, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता), शिवाजी पांडुरंग मरगळे Shivaji Pandurang Margale (वय २१, रा. शिवतेजनगर, कोल्हेवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार जितू जाधव, प्रथमेश पवार, मयूर सूर्यवंशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रिक्षा चालक इक्राहिम ऊर्फ अज्जू अहमद शेख (वय ४८, रा. अश्रफनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोंढव्यातील काकडे वस्ती परिसरात पुणे महानगर पालिका क्रीडांगणावर ८ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता घडली होती. प्रथमेश पवार व मयुर सूर्यवंशी यांच्यावर खुनासह मारामारीचे प्रत्येकी ३ गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक शेख पुणे महापालिकेच्या क्रीडांगणाजवळ रिक्षा वळवित होते. त्या वेळी आरोपी जाधव, घावरे, जावळे आणि साथीदार दुचाकीवरुन निघाले होते. रिक्षा वळवत असताना दुचाकीस्वार आरोपी समोर आले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी शेख यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्याकडील असलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. शेख यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या शेख हे तेथून पळून गेले. दोन दिवसांनी शेख यांनी याची माहिती कोंढवा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार झालेल्या चौघा आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, प्रतिक लाहिगुडे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडिस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांनी केली आहे.
