Pune Crime News | डॉक्टरांचे अपहरण करुन 19 लाखांची खंडणी उकळणार्या चौघांना ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | कारमधून जात असलेल्या डॉक्टरांचे अपहरण करुन १९ लाखांची खंडणी उकळण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व ऊरुळी कांचन पोलिसांनी अपहरण करणार्या चौघांना अटक करुन त्यांच्याकडून कार आणि खंडणीतील रक्कम असा १५ लाख ८० हजारांचा माल जप्त केला आहे. डॉक्टरांचा ड्रायव्हरच अपहरणकर्त्यांचा साथीदार असल्याचे निष्पन्न झाले.
राजेंद्र छगन राजगुरु Rajendra Chhagan Rajguru (वय ३२, रा. अनंतपूर, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), संतोष सोमनाथ बनकर Santosh Somnath Bankar (वय ३६, रा. अनंतपूर, पैठण), दत्ता ऊर्फ गोटू बाळु आहेर Datta alias Gotu Balu Aher (वय ३४, रा. अनंतपूर, पैठण), सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर Sunil alias Sonu Muralidhar Magar (वय ३०, रा. गणेशनगर, गारखेडा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे ३ गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहेत.
कुंजीरवाडी येथील ५८ वर्षाचे डॉक्टर हे १० जानेवारी रोजी रात्री सव्वादहा वाजता सोलापूर -पुणे महामार्गावरुन ऊरुळी कांचन कडून कुंजीरवाडीकडे कारमधून जात होते. त्यावेळी राजेंद्र छगन राजगुरु हा गाडी चालवत होता. इनामदार वस्ती येथे डॉक्टरांचे कारला पांढरे रंगाची इरटीगा कार आडवी करण्यात आली. डॉक्टरांची कार थांबविली. कारमधून ४ जण डॉक्टरांच्या कारमध्ये बसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टरांचे अपहरण करुन पुन्हा ऊरुळी कांचन येथून शिंदवणे बाजूकडे घेऊन गेले. डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ४ लाख रुपये खंडणी घेऊन डाूक्टरांना चौफुला येथे सोडले व आणखी १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. डॉक्टरांनी भितीपोटी १२ जानेवारी रोजी १५ लाख रुपये दिले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
हा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पोलिसांकडील अशी दोन पथके तयार करण्यात आली. फियार्दी व साक्षीदारांकडे तपास करत असताना डॉक्टरांच्या ड्रायव्हरवरील संशय बळविला. राजेंद्र राजगुरु हा २ ते ३ वषार्पूर्वी डॉक्टरांकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. त्यानंतर आता परत त्यांच्याकडे काम करु लागला होता. त्याचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर तो आरोपींशी पूवीर्पासून संपर्कात असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने साथीदारांच्या मदतीने डॉक्टरांचे अपहरण करुन खंडणी घेतल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य तिघांना अटक केली. हे तिघे मोलमजुरी करणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एरटीगा कार व गुन्ह्यातील खंडणीची रक्कम ७ लाख ८० हजार रुपये असा एकूण १५ लाख ८० हजार रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, राजू मोमीन, योगेश नागरगोजे,धीरज जाधव, अजित काळे, प्रविण चौधरी , निलेश जाधव, प्रशांत पवार, विशाल रासकर, सुमित वाघ, दीपक यादव, अमोल राऊत यांनी केला आहे.
