Koregaon Park Pune Crime News | रस्त्यात भटक्या कुत्र्यांना जेवण देणार्याच्या नाकाचे हाड केले फ्रॅक्चर; रस्ता देण्यावरुन झाला होता वाद
पुणे : Koregaon Park Pune Crime News | कोेरेगाव पार्क परिसरातील भटक्या कुत्र्यांना जेवण देत असताना रस्ता देण्यावरुन झालेल्या वादात एकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर (Nasal Bone Fractures) करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
याबाबत सायमन मोती फ्रान्सेस विरम (वय ६०, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार चाकी वाहनचालक श्रीकांत गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी आठ ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील मोरया सोसायटीचे (Maurya Society Koregaon Park) गेटजवळ घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रस्त्यावरील भटके कुत्र्यांना जेवण देत होते. त्यावेळी चारचाकी वाहनातून गायकवाड आले. त्यांनी शिवीगाळ करुन हाताचे बुक्कीने नाकावर जोरात ठोसा मारला. यामुळे त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डोळ्याचे खाली व डोक्यावर, कपाळावर दुखापत झाली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक भुजबळ तपास करीत आहेत. (Pune Crime News)
यविरोधात श्रीकांत पांडुरंग गायकवाड (वय ४०, रा. गायकवाड आळी, मुंढवा)
यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याला फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे चार चाकीने कोरेगाव पार्कमधून जात होते.
त्यावेळी सायमन व इतर दोघांनी रस्ता न देण्याचे कारणावरुन त्यांच्याशी वाद घातला.
झटापट करुन लाथाबुक्कक्यांनी मारहाण केली. शेजारी पडलेल्या झाडाच्या फांदीने फिर्यादीचे डोळ्यास,
डोक्यावर, हातावर जोराने मारुन दुखपत केली. पोलीस हवालदार कांबळे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश