Pune Crime News | पुणे सोन्यावर ऑनलाईन कर्ज घेऊन रुपीक फिनटेक कंपनीची फसवणूक

Fraud

पुणे : Pune Crime News | सोन्यावर ऑनलाईन कर्ज देणाऱ्या रुपीक फिनटेक कंपनीची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 15 मार्च 2023 रोजी ऑनलाइन घडला आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी (Chaturshrungi Police Station) पाषाण येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. सहदेव रामप्रकाश शर्मा (वय-32 रा. श्री गणेश अपार्टमेंट, सिंधटेक सोसायटी पाषाण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत रुपीक फिनटेक प्रा. लि. (Rupeek Fintech Pvt Ltd) कंपनीचे कर्मचारी त्रिमुर्ती मल्लिकार्जुन कोळी (वय-28 रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) यांनी चतृश्रृंगी पोलिसांकडे तक्रार केली आहे. यावरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी रुपीक फिनटेक प्रा. लि. कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीकडून ऑनलाईन सोने तारण कर्ज दिले जाते. आरोपीने ऑनलाईन सोने तारण कर्ज या टेकओव्हर प्रकारातील कर्ज मागणी केली होती. त्यानुसार आरोपीने 221.80 ग्रॅम सोने तारण ठेवण्याचे कबुल केले होते. (Pune Crime News)

फिर्यादी यांच्या कंपनीने आरोपीला 7 लाख 21 हजार 612 रुपये कर्ज मंजुर केले. कर्जाची रक्कम आरोपीच्या ICICI बँक खात्यावर जमा केली. त्यानंतर फिर्यादी यांनी सहदेव शर्मा याला सोने आणून देण्यास सांगितले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन सोने आणून दिले नाही. आरोपीने सोने न देता फिर्य़ादी यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

You may have missed