Pune Crime News | फ्रिचा मोह पडला महागात ! पोलिसांचे खाते झाले रिकामे, मध्यप्रदेशातील बँक खात्यात गेले पैसे

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | फ्रिमध्ये टी व्ही चॅनेल अँड्रॉईड टीव्हीवर दिसणार, अशी जाहिरात इंस्टाग्रामवर दिसली. फ्रि चा मोह एका पोलीस हवालदारांना झाला. त्यांनी त्यावर  क्लीक केले, त्याबरोबर त्यांचा मोबाईल हँग होऊन बँक खाते रिकामे झाले. अधिक तपासात हे पैसे मध्य प्रदेशातील एकाच्या खात्यात गेल्याचे आढळून आले आहे.

याबाबत मुंढवा येथे राहणार्‍या एका ४४ वर्षाच्या पोलीस हवालदार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी यशराज बैरागी (रा. शाजापूर, मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी ऑनलाईन घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या इंस्टाआयडीवर एक फ्रिमध्ये टीव्ही चॅनेल अँड्रॉईड टीव्हीवर दिसणार, अशी जाहिरात आली. या जाहिरातीवर त्यांनी क्लीक केले असता त्यांच्या मोबाईल अचानक हँग होऊ लागला. त्यावेळी त्यांनी मोबाईल स्वीच ऑफ केला. त्यानंतर चार्जिंग करुन मोबाईल ओपन केला़ दुसर्‍या दिवशी १२ डिसेंबर रोजी ते डिमार्ट येथे शॉपिंग करुन गुगल पे नंबर वरुन डी मार्ट येथे पेमेंट केले. त्यावेळी त्याच्या बँक अकाऊंटशी लिंक असणारा फोन पे अ‍ॅपद्वारे ४१ हजार व ३० हजार कट होऊन ते यशराज बैरागी असे फोन पे वर नाव दिसत असलेल्या व्यक्तीस ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे पैसे यशराज बैरागी याच्या मध्यप्रदेशातील शाजापूर येथील खात्यात गेल्याचे दिसून आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराज डोके तपास करीत आहेत.

You may have missed