Pune Crime News | मित्राला घेतले घरात, त्यानेच संसार मोडला; विवाहितेने गळफास घेऊन आपल्या चुकीचे घेतले प्रायश्चित, सुसाईड नोटचे तुकडे जुळवून पोलिसांनी आणली महिलची कहानी समोर

Pune Crime News | Friend took her into the house, he broke the family; Married woman atoned for her mistake by hanging herself, police brought the woman's story to light by piecing together the pieces of the suicide note

पुणे : Pune Crime News ।  त्या दोघांचे लग्न झाले. त्यांचा संसार आनंदाने सुरु होता. मित्राला रहायला जागा नसल्याने त्याने मित्राला घरात घेतले. मित्राने मात्र, त्याचे उपकार लक्षात न घेता आपल्याच मित्राच्या पत्नीवर  प्रेमाचे जाळे फेकले. तीही वाहवत गेली. त्यातून पतीपत्नीत भांडणे झाले. दोघे वेगळे राहू लागले. तेव्हा मित्र तिला ब्लॅकमेल करु लागला.

तिला आपली चुक लक्षात आली. ती आपल्या पतीकडे परत जाणार होती. पण, त्याला मित्राचा विरोध होता. तुझ्याबरोबरचे फोटो व्हायरल करतो, असे म्हणून तो धमकावित होता. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ती जेथे काम करत होती, तेथे तिने सुसाईड नोट लिहून ती फाडून टाकली होती. पोलिसांनी पारदर्शक टेपने ही सुसाईड नोटचे तुकडे जुळविले. तिच्या कृत्यामागील कारण समोर आले असून चंदननगर पोलिसांनी या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

करण सुरेश शिंदे (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या मित्राचे नाव आहे. पुजा (वय २७) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पुजा हिच्या भावाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ सप्टेंबर २०२४ ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा हिचा विवाह २०१६ मध्ये झाला होता. त्यांना एक ९ वर्षाचा मुलगा आहे. पुजा ही कल्याणीनगर येथे एके ठिकाणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. गेल्या ५ महिन्यांपासून ती माहेरी रहात होती. किरण शिंदे हा पुजा हिच्या पतीचा मित्र आहे. पुजाच्या पतीने करण याला आपल्या सोबत रहायला घेतले होते. ते सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत करण त्यांच्या घरात एकत्र रहायला होता.

या दरम्यान, करण याने पुजाला आपल्या प्रेमात ओढले. हे पुजाच्या पतीला समजल्यावर त्याच्यात भांडणे झाली. त्यांनी करण शिंदे याला घरातून बाहेर काढले. त्यानंतर दोघे पतीपत्नी सोबत राहु लागले. त्यानंतरही पुजा व करण शिंदे हे संपर्कात असल्याचे समजल्यावर पतीपत्नीमध्ये पुन्हा भांडणे झाली. दोघे वेगवेगळे रहायला लागले. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये पुजा आपल्या मुलाला घेऊन माहेरी आली. पुजा हिला आता आपल्या सर्व वागण्याचा पश्चाताप झाला होता. तिने करण शिंदे याच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते. तिने पुन्हा तिचा संसार नव्याने चालु करण्याचा निर्णय घेतला होता. तिने आईवडिलांची माफी मागितली होती. लवकरच पुन्हा पतीकडे रहायला जाणार होती. पंरतु, यास करण शिंदे हा तिला विरोध करत होता.

९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता पुजा घरात एकटीच होती. तिने दार उघडले नाही म्हणून तिचा भाऊ व इतरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर पुजा हिने गळफास घेऊन आपले जीवन संपविले होते.

त्यानंतर पुजा जिथे काम करत होती. त्यांनी पोलिसांना बोलावून पूजा हिने लिहिलेल्या सुसाईड नोटचे तुकडे दाखविले. त्यावरुन पोलिसांनी सुसाईड नोट असलेले कागदाचे तुकडे बारकाईने एकत्र केले. सर्व कागदाचे तुकडे पारदर्शक टेपने एकत्र जोडले. त्यावरील अक्षर पुजा हिचे असल्याचे फिर्यादी यांनी ओळखले.

पुजा हिची सुसाईड नोट

मी पुजा माझ्या स्वत:चे वाटुळ करुन घेतले आहे. करण शिंदे या माणसाने मला खूप त्रास दिला आहे. माझ्याकडून सतत पैशांची मागणी करत होता. ब्लॅकमेल करत होता. म्हणून मी त्याला पैसे देत होते. माझ्या मोबाईल मध्ये  कॉल रेकॉर्ड आहे. त्याच्या बोलण्याचे, सतत पैसे मागतो मला. माझ्या फोन पे मध्ये पैशाची कॉल हिस्ट्री  आहे. मला नुसत्या धमक्या देतो, माझा संसार मोडला याने, याचा संसार मी मोडला नाही. मला धमक्या देतो हा, मी खुप वैतागले आहे. याच्यामुळे माझे घरचे आई वडिल, भाऊ बहिण सगळे माझ्यापासून दूर गेले आहे. माझ्या फोनमध्ये सगळे रेकॉर्ड आहे. मी या त्रासाला खुप कंटाळले आहे. मी कुणालाही दोष देत नाही, माझ्या मुलाचे नुकसान पण या माणसाने केले आहे.

माझ्या मुलाची काळजी घ्या, मला माफ करा. मी खुप चुकले़ मला माझ्या चुकीची लाज वाटते, खरंच मी चुकले़ मी माझ्या चुकांमुळे या करण शिंदे याच्या त्रासामुळे़ हा माणूस मला सतत धमक्या देतो, blackmail करतो. खूप नको नको झाल आहे, मला जगू पण वाटत नाही़ माझ्या मुलाला व्यवस्थित सांभाळा. मम्मी मी तुझी मनापासून माफी मागते़, खरच ग खूप मोठी चुक केली मी, पापा मी तुमच्या इज्जतीचा विचार केला नाही. माझ्यावर खूप विश्वास होता तुमचा, तो मी मोडला. मला खरंच माफ करा. माझ्या मुलाची पण मी मनापासून माफी मागते, एक मोठी बहिण म्हणून मी चुक केली़ तूझ्या नजरेत मी पडले, सॉरी सगळ्यांना आणि माझ्या नवर्‍याची पण माफी मागते मी. मला शेवटच माफ करा.

सगळे मला माफ करतील हीच शेवटची इच्छा आहे. sorry, sorry sorry sorry, बाळा मला माफ कर, एक आईच प्रेम मी देवू शकले नाही. पप्पा ला कधीही एकट सोडू नको,

तुमच्या सगळ्यांची
pooja पुजा

(पूजा हिच्यासारखी पश्चातापाची वेळ आणखी कोणावर येऊ नये, म्हणून ही तिची सुसाईड नोट देत आहोत़) 

You may have missed