Pune Crime News | मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद ! वाहतूक नियमभंग करणार्‍यांवर कारवाईसाठी लावलेल्या नाकाबंदीत पकडलेल्या टोळीकडून 2024 पासूनच्या 20 दुचाकी जप्त

Pune Crime News | Gang of two-wheeler thieves arrested for fun! 20 two-wheelers from 2024 seized from gang caught during roadblocks imposed to take action against traffic violators

पुणे : Pune Crime News | वाहतूक नियमभंग करणार्‍यांविरुद्ध शहर पोलिसांनी मोठी मोहिम उघडली आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी उत्तमनगरमध्ये लावलेल्या नाकाबंदीत विना नंबरप्लेट गाडी वापरणारा अल्पवयीन मुलगा सापडला. त्यावरुन उत्तमनगर पोलिसांनी त्याच्या साथीदाराला पकडून तब्बल २०२४ पासूनचे १४ गुन्हे उघडकीस आणून २० दुचाकी जप्त केल्या आहेत.

महेश हनुमानसिंग राजपुत Mahesh Hanuman Singh Rajput (वय २३, रा. एन डी ए पोलीस चौकीमागे, उत्तमनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फायनान्स कंपनीत कामाला असल्याचे सांगून फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या गाड्या असल्याचे सांगून चोरीच्या या गाड्या ते विक्री करीत असत. उत्तमनगर पोलिसांनी कोथरुड, उत्तमनगर, बावधन, पुणे ग्रामीण, राजगड परिसरातून २० दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यापैकी १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नंबरप्लेट नसलेला दुचाकी चालविणार्‍या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने ही दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. ही दुचाकी उत्तमनगर मधून चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर या अल्पवयीन मुलाने महेश राजपूत व त्याचा मित्रासोबत ही चोरी केल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी शोध घेऊन खडकवासला येथून मोटारसायकलसह २६ फेब्रुवारी रोजी महेश राजपुत याला पकडले. त्याच्याकडील स्प्लेंडर प्लस ही चोरीची असल्याचे सांगून तिची नंबरप्लेट बनावट असल्याचे सांगितले. ही मोटारसायकल कोथरुडमधून चोरली असल्याचे दिसून आले.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरातील २० दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आपण फायनान्स कंपनीत कामाला असून कंपनीने ओढून आणलेल्या या दुचाकी असल्याचे सांगून ते चोरीच्या दुचाकी विकत असत. कोथरुड पोलीस ठाण्यातील ४, उत्तमनगर, वारजे आणि बावधन मधील प्रत्येकी २, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, नांदेड सिटी, राजगड मधील प्रत्येकी एक असे १४ गुन्हे उघडकीस आलेआहेत. त्यांच्याकडून १५ लाख रुपयांच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे, मुकेश कुरेवाड, राजनारायण देशमुख, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड, चेतन बराटे, परमेश्वर पाडळे, अजय पवार, ज्ञानेश्वर तोडकर, अनिरुद्ध गायकवाड यांनी केली आहे.

You may have missed