Pune Crime News | कोंढव्यात टोळक्याने दुकानात तोडफोड करुन पसरवली दहशत; रिक्षाची तोडफोड करुन केले नुकसान

पुणे : Pune Crime News | टोळक्याने दुकानात शिरुन आतील फ्रिज, बरण्या यांची तोडफोड करुन नासधुस केली. दुकानाबाहेरील रिक्षावर कोयते मारुन नुकसान करुन दहशत माजविण्याच्या प्रकार कोंढव्यात घडला आहे.
याबाबत फरमान अन्सासी (वय २८, रा. शांग्रीला अपार्टमेंट, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अरमान इलियास शेख याच्यासह ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील युनिटी पार्क रोडवरील बैतुल उलुन मदरसासमोरील अमन मार्केटमध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे मित्र शेहजाद अन्सारी, झिशान व फिर्यादीचा भाऊ जावेद अन्सारी हे अमन मार्केट दुकानामध्ये होते. त्यावेळी अरमान शेख हा त्याच्या ५ ते ६ साथीदारांना घेऊन आला. त्यांनी हातातील धारदार शस्त्राने फिर्यादीचे दुकानामध्ये ठेवलेल्या फरसाण, चॉकलेटच्या बरण्या व इतर खाद्य पदार्थ याची तोडफोड केली. तसेच दुकानातील फ्रिजची काच फोडून त्याचे नुकसान केले. दुकानाचे परिसरात धारदार शस्त्रे हवेत फिरवत दहशत माजवली. मुनावर इक्बाल खान यांच्या रिक्षावर कोयते मारुन त्यांच्या रिक्षाचे नुकसान केले. त्यानंतर दुचाकीवर बसुन जे के पार्कच्या दिशेने निघुन गेले. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे तपास करीत आहेत.