Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने वाहनांची तोडफोड करुन तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न; येवलेवाडी पोलिसंनी 6 जणांना केली अटक
पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाला दांडक्याने मारहाण करुन त्यांचा खुनाचा प्रयत्न केला. परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरविली. येवलेवाडी पोलिसांनी या टोळक्यातील ६ जणांना अटक केली आहे.
अविनाश मारुती दीक्षित (वय २०, रा. मरळ बिल्डिंग, भोलेनाथ चौक, कोंढवा बुद्रुक) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी चिक्या उर्फ विश्वजित भोसले Chikya alias Vishwajit Bhosale (वय २१, रा. साईनगर, कोंढवा), साई उर्फ वक्या हौसमणी Sai alias Vakya Housmani, आर्यन वाव्हळे, मंगेश उर्फ डुल्या सावंत, सोहम हुरळीकर, दर्शन वठार (सर्व रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते पसार झाले आहेत. याबाबत जखमी अविनाश दीक्षित यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोंढव्यातील भोलेनाथ चौक येथे २३ मार्च रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित याची आरोपींशी भांडणे झाले होती. मंगळवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दीक्षित आणि त्याचा मित्र रिक्षात मोबाइलवर गेम खेळत होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांच्याकडे दांडके आणि शस्त्रे होती. टोळक्याने दीक्षित याला शिवीगाळ करुन दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. टोळक्याने दीक्षित आणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्राला मारहाण केली. परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली, तसेच शस्त्रे उगारून नागरिकांना शिवीगाळ केली. या घटनेत अविनाश दीक्षित हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे तपास करीत आहेत.
