Pune Crime News | मॉर्निंग वॉकला जाणार्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद; अलंकार पोलिसांनी कामगिरी, 250 सीसीटीव्हीद्वारे काढण्यात आला माग

पुणे : Pune Crime News | मॉर्निक वॉकला जाणार्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्या टोळीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. तब्बल २५० सीसीटीव्हीद्वारे गुन्हेगारांचा माग काढण्यात आला. तसेच पोलीस पथकाने अनेक दिवस पहाटे ३ ते सकाळी ९ वाजेपर्यंत परिसरात पेट्रोलिंग करुन आरोपी निष्पन्न केले. (Alankar Police News)
सुमित ऊर्फ अभिषेक ऊर्फ डायमंड राजू आसवरे (वय १९, रा. किष्किंदानगर, कोथरुड), अभिषेक ऊर्फ कानोळ्या भारत खंदारे (वय २२, रा. किष्किंदानगर, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Arrest In Robbery Case)
अमरेश मुसळे (वय ५२, रा. गणेशमळा, सिंहगड रोड) हे २४ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता आयोध्या हॉटेलसमोर आले असताना दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅमची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावली व तिसर्या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून ते पळून गेले होते. अलंकार पोलीस ठाण्यात याचा गुन्हा दाखल झाला होता.
मॉर्निग वॉकला जाणार्या वेगवेगळ्या व्हॉटस अॅप ग्रुपवर गुन्ह्यांची माहिती प्रसारित झाल्याने मॉर्निंग वॉककरीता जाणार्या नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपायुक्त संभाजी कदम व सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. गुन्ह्याचा तपास सुरु असताना घटनास्थळावरील तसेच आजू बाजूच्या परिसरातील २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींनी त्यांच्या दुचाकीवरील नंबर प्लेट काढली होती. त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. दरम्यान, गेल्या आठवड्यात या चोरट्यांनी डी पी रोडवर सार्थ कांबळे याला तरुणाला मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीविषयी आणखी माहिती मिळाली. अशाच प्रकारे आणखी काही ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे घडले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसरा फरार आहे.
अभिषेक खंदारे याच्यावर यापूर्वीचे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच फरारी आरोपीवर ७ गुन्हे दाखल आहेत. सुमित आसवरे आणि अभिषेक खंदारे यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी डी पी रोडवरील दोन आणि चतु:श्रृंगी परिसरातील एक असे तीन गुन्हे केल्याची कबुल दिली आहे. गुन्ह्यात चोरलेल्या दोन सोन्याच्या चैन, एक सोन्याचे पेंडट, गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल, एक तलवार असा एकूण २ लाख ८६ हजार २५० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, शिवाजी शिंदे, अंकुश शिंदे, साईनाथ पाटील, नवनाथ आटोळे, नितीन राऊत, माधुरी कुंभार, शंभवी माने यांनी केली आहे. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या
Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त
Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”