Pune Crime News | तरुणाकडून गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतुसे हस्तगत; चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी
पुणे : Pune Crime News | विक्रीसाठी ग्राहक शोधत असलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. (Pistol Seized)
कुणाल संतोष लांडगे Kunal Santosh Landge (वय २१, रा. आंबेडकर वसाहत, डी पी रोड, औंध) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार शनिवारी गस्त घालत होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil) यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कुणाल लांडगे याच्याकडे गावठी पिस्तुल आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/reel/C_Xi07yJs-O/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने (ACP Anuja Deshmane) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi) , पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे (PI Yuvraj Nandre), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रणील चौगुले (PSI Pranil Chowgule) व तपास पथकातील पोहवा दुशिंग, पोशि भांगले, पोशि खरात, पोशि तरंगे, पोहवा दुर्गे, पोहवा वाघवले, पोहवा तांदळे, पोहवा मोमीन, पोहवा विशाल शिर्के, पोहवा श्रीधर शिर्के, पोहवा दांगडे, पोहवा माने यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद