Pune Crime News | सिंहगड रोड परिसरात कोयता घेऊन दहशत पसरविणार्‍या गुंडांच्या मुसक्या आवळल्या; गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी

Arrest logo with pune police

पुणे : Pune Crime News | आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही, असे म्हणत हातात कोयते घेऊन जाणार्‍या येणार्‍या लोकांना धमकावत दहशत माजविणार्‍या गुंडांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने मुसक्या आवळल्या.

अनुराग संभाजी दारवटकर (वय २८, रा. नांदेड गाव) आणि विजय अशोक तारु (वय २२, रा. नांदेडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ अंतर्गत नांदेड सिटी पोलीस ठाण्याकडील सी आर मोबाईलवरील पोलीस अंमलदार गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत होते. यावेळी चालक पोलीस अंमलदार संभाजी कोंढावळे व दिनेश झोळे तसेच दीपक सपकाळ हे रात्री शिवणे नांदेड रोडवरुन नांदेड गावातून येत होते. शिवशंकर अमृततुल्य हॉटेलमधील दोघे जण अरेरावी करुन आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही, असे म्हणत त्यांच्यातील एक जण हातामध्ये लोखंडी हत्यार घेऊन सार्वजनिक रोडवर येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत माजविताना दिसून आला. पोलीस अंमलदारांनी दोघांना पकडून त्यांना नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जया सोनटक्के व त्यांच्या सहकाºयांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार तसेच पोलीस अंमलदार संभाजी कोंढावळे, दिनेश झोळे व दीपक सपकाळ यांनी केली आहे.

You may have missed