Pune Crime News | घेतलेले पैसे परत मागितल्यावर आत्महत्या करण्याची किराणा व्यापार्‍याची धमकी, 19 लाखांची फसवणुक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  ओळखीच्या किराणा दुकानदाराने रिलायन्स मॉल बंद होत आहे. तेथील किराणा माल कमी दरात खरेदी करण्यासाठी १९ लाख रुपये घेतले. दिलेले पैसे परत मागितल्यावर या किराणा व्यापार्‍याने स्वत:च्या जीवाचे बरे वाईट करेल आणि तुमचे नाव टाकेन, अशी धमकी देऊन १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत उमा प्रल्हाद जाधवर (वय ३५, रा. आर्यनगर, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राकेश रमणलाल पारख (रा. दीप हायटस, रामवाडीनगर रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश पारख हे फिर्यादी यांच्या लहानपणापासून तोंड ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे  फ्रुटचे दुकान आहे. राकेश पारख याचे किराणा दुकान आहे. त्यांच्यात चांगली ओळख झाल्यानंतर त्याने किराणा मालाचा व्यापार करुन बाहेर सप्लाय करायचा असून पैसे कमी पडत आहे. माझ्या व्यवसायास मदत म्हणून रक्कम लावल्यास त्या नफ्यातील ठराविक रक्कम तुम्हाला देतो, असे त्याने सांगितले. तेव्हा त्यांचा भाऊ दत्ता खाडे याने त्याच्यावर विश्वास ठेवून काही रक्कम दिली. त्यानंतर त्याने एक रिलायन्स मॉल बंद होणार आहे. तेथील माल खरेदी करण्यासाठी जास्त रक्कम लागणार आहे, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांना वेळोवेळी जानेवारी ते मे व सप्टेंबर २०२४ पर्यंत एकूण १० लाख ४५ हजार रुपये दिले. त्यांना राकेश याने १ लाख ९५ हजार रुपये परत केले.

उर्वरित ८ लाख ५० हजार रुपये परत केले नाहीत. त्यांच्या लहान मावशीचा मुलगा विनोद दरांडे याने राकेश याला ३ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. दत्ता खाडे याच्याकडून राकेशने ७ लाख रुपये घेतले. त्याने फिर्यादी यांना किराणा मालाचे ट्रेडिंग व्यवसायाचे व मे २०२४ मध्ये रिलायन्स मॉल चा माल विक्रीसाठी निघणार आहे, तो खरेदी करण्यासाठी असे मिळून एकूण १९ लाख घेतले. त्यानंतर तो रक्कम देतो, असे वारंवार सांगत आहे. त्यांनी पैशांची मागणी केली असता तो पैसे देण्यास नकार देऊन मी माझे जिवाचे बरेवाईट करेल आणि तुमचे नाव टाकेन, अशी धमकी देत आहे. व्यावसायाच्या कारणासाठी पैसे घेऊन त्याने १९ लाखांची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.

You may have missed