Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या सराईत गुन्हेगाराला अटक करुन हडपसर पोलिसांनी 24 तासात दाखल केले दोषारोपपत्र

crime

पुणे : Pune Crime News |  किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीकडे चार्जर मागण्याच्या बहाण्याने लगट करुन तिचा विनयभंग करणार्‍या नराधमाचा शोध घेऊन हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध २४ तासात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

ओमकार बाळकृष्ण कोरडे Omkar Balakrishna Korde (वय २६, रा. प्रफुल्ल कॉलनी, काळेपडळ) असे या नराधमाचे नाव आहे. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ओमकार कोरडे याच्याविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार हडपसर परिसरातील केशव क्रिएश्न जनरल स्टोअर्स येथे २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता घडला होता.

एक अल्पवयीन मुलगी किराणा सामान घेण्यासाठी दुकानात गेली होती. आरोपीने तिच्याकडे चार्जर मागण्याच्या बहाण्याने जवळीक साधत लगट करण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केला होता. मुलीने आरडाओरडा केल्यावर तो पळून गेला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया कोलेवाड यांच्याकडे देण्यात आला होता.

तपास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासून सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे यातील आरोपी ओमकार कोरडे याची ओळख पटविली. त्याचा शोघ घेऊन अटक केली़ गुन्हा करताना परिधान केलेला निळा कुर्ता व दुचाकी जप्त केली. तसेच यातील साक्षीदारांकडे तपास करुन त्यांचे जबाब नोंदविण्यात आले. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करुन २४ तासाच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सुचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया कोलेवाड, पोलीस अंमलदार लोंढे, केसकर, धावडे, पांडे, महिला अंमलदार पवार यांनी केली आहे.

You may have missed