Pune Crime News | वाहनचोरी करणार्‍या चोरट्याला तुळजापूरहून पकडून हडपसर पोलिसांनी वाहनचोरीचे 4 गुन्हे आणले उघडकीस; अल्पवयीन मुलाकडून एक दुचाकी जप्त

Pune Crime News | Hadapsar police arrests vehicle thief from Tuljapur, uncovers 4 cases of vehicle theft; One two-wheeler seized from minor

पुणे : Pune Crime News |  शहरात सर्वाधिक वाहनचोरीचे गुन्हे हडपसर परिसरात होत असतात. या वाहन  चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याच्या हडपसर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून तुळजापूर, लातूर परिसरात शोध घेऊन एका वाहन चोरट्याला पोलिसांनी अटक केली़. त्याच्याकडून ४ वाहन चोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत.

रवींद्र शिवाजी घाटे Ravindra Shivaji Ghate (वय ४०, रा. दहीवाडी, ता़ तुळजापूर, जि़ धाराशिव) असे या चोरट्याचे नाव आहे.

हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी व सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार यांनी वाहन चोरी संबंधित माहिती गोळा करुन विविध भागात गस्ती व तपास सुरु केला. पोलीस अंमलदार रविकांत कचरे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने बार्शी, तुळजापूर, लातूर परिसरात शोध मोहिम राबवुन रवींद्र घाटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेल्या ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दुसर्‍या एका तपासामध्ये एका अल्पवयीन मुलाला पकडून त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली आहे. हडपसर पोलिसांनी ३ लाख ३० हजार रुपयांच्या १ बुलेट, २ होंडा शाईन, २ टिव्हीएस रायडर अशा ५ गाड्या जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांनी केली आहे.

You may have missed