Pune Crime News | इथे 30 ते 40 जण तलवारी घेऊन फिरताहेत ! दहीहंडीच्या दिवशी आलेल्या कॉलने पोलिसांची धावपळ, काय होता प्रकार वाचा सविस्तर

Police-Contral Room

पुणे : Pune Crime News | मी कमला नेहरू हॉस्पिटलजवळ (Kamla Neharu Hospital) एकटा असून ३० ते ४० लोक तलवार घेऊन फिरत आहेत, त्यांच्याजवळ दारुच्या बॉटल आहे. मला मारहाण होऊ शकते, मला पोलीस मदत हवी आहे, असा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला (Pune Police Control Room). शहरात दहीहंडी उत्सव (Dahi Handi 2024) रंगात आला असताना असा कॉल आल्याने पोलिसांची एक धावपळ उडाली. बीट मार्शल तातडीने घटनास्थळी गेले. परंतु, तेथे असला काही प्रकार दिसून आला नाही. त्यांनी कॉल करणार्‍याला फोन केल्यावर त्याचा फोन बंद आढळून आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.

पोलिसांनी तांत्रिक माहिती घेतली असता तो फोन एका महिलेच्या नावावर असल्याचे लक्षात आले. त्या महिलेशी संपर्क साधल्यावर तिने बहिणीचा मुलगा रोहित मुकेश चव्हाण (वय २२, रा. मंगळवार पेठ) हा हे सीम वापरत असल्याचे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दहीहंडीच्या दिवशी कामावर जात असताना रस्त्यावर गर्दी दिसल्याने कॉल केला. नंतर मोबाईल बंद करुन कामावर निघून गेल्याचे सांगितले. पोलीस नियंत्रण कक्षाला जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्याचे निष्षन्न झाले. त्यामुळे बीट मार्शल विवेक पाटील यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली असून रोहित चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहर पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, तात्काळ पोलीस मदतीसाठी १०० व ११२ यांचा वापर करावा. विनाकारण, मजा म्हणून व त्रास देण्याच्या हेतूने खोटे कॉल (Fake Calls To Police Control Room) केल्यास त्यांचेवर कठोर कारवाई होऊ शकते.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार (Nutan Pawar ACP)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे (PI Prashant Bhasme), पोलीस निरीक्षक अजित जाधव (Ajit Jadhav PI),
सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad API), अन्सार शेख (API Ansar Shaikh),
पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे (PSI Arvind Shinde), पोलीस अंमलदार गौस मुलाणी यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chhatrapati Shambhu Raje Rajyabhishek Trust | प्रसिध्दीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता जपावी; छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टची मागणी

Catalyst Foundation Pune | डीजे, लेझर लाईट वापरणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करा; सुनील माने यांचे सह पोलीस आयुक्तांना निवेदन

Parvati Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार पाठलाग करुन रिक्षाचालकाने केला विनयभंग

Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण