Pune Crime News | आर्थिक व्यवहारावरुन हॉटेलमध्ये शिरुन केली तोडफोड; तुळजाभवानीनगरमधील घटनेत खराडी पोलिसांनी दाखल केला अदखलपात्र गुन्हा

Pune Crime News | Hotel vandalized after entering over financial transaction; Kharadi police registers non-cognizable case in Tuljabhawani Nagar incident

पुणे : Pune Crime News |  आर्थिक व्यवहारावरुन झालेल्या वादातून एकाने हॉटेलमध्ये शिरुन तेथील खुर्च्यांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत खराडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत भरत शांतीदास कुमार (वय ३६, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडला होता.

याबाबत भरत कुमार यांनी सांगितले की, त्यांचा तुळजाभवानी नगरमध्ये महावीर हॉटेल नावाने हॉटेल व्यवसाय आहे. योगेश काळे यांच्याबरोबर गेल्या ५ वर्षांपासून त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत. फ्लॅट खरेदीसाठी त्यांनी योगेश काळे यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले होते. फ्लॅट खरेदीमध्ये जो मध्यस्थ होता, त्याने भरत कुमार यांची फसवणूक केली. तरी भरत कुमार यांनी ५ लाखांपैकी ३ लाख ८० हजार रुपये योगेश काळे यांना परत केले आहेत. योगेश काळे हे १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या हॉटेलमध्ये आले व पैसे मागू लागले. तेव्हा भरत कुमार यांनी आता आपल्याकडे पैसे नाहीत, पैसे आले की तुमचे सर्व पैसे देतो, असे सांगितले. त्यावरुन योगेश काळे यांनी हॉटेलमधील प्लास्टिक खुर्च्या तोडून फोडून नुकसान केले, असे भरत कुमार यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. पोलीस हवालदार एम बी तारु तपास करीत आहेत.

You may have missed