Pune Crime News | स्पाय कॅमेरे बसवून पत्नीचे अंघोळ करतानाचे खासगी व्हिडिओ काढून पतीची धमकी; शासकीय अधिकारी पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | पती पत्नीच्या वादात चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला मारहाण केली. इतर नातेवाईकांच्या मदतीने घरामध्ये स्पाय कॅमेरे बसवून महिलेचे अंघोळ केल्याचे व खासगी व्हिडिओ चित्रीकरण पतीने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Ambegaon Police)
याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी या महिलेचा पती, सासु, तीन नंणद व दोघींचे पती अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ जून २०२० पासून १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचे पती हे दोघेही नोकरी करतात. फिर्यादीचे लग्न झालेपासून शारीरीक, मानसिक छळ करुन चारित्र्यावर संशय घेऊन वाईट शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला माहेरुन गाडीसाठी दीड लाख रुपये तसेच गाडीचे हप्ते भरण्यास पैसे आणण्यास सांगितले. कारचे हप्ते भरण्यास सांगितले असता फिर्यादीने नकार दिल्याने त्याचा राग मनात धरुन पतीने फिर्यादीस वाईट शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. इतरांच्या मदतीने घरामध्ये स्पाय कॅमॅरे बसवुन फिर्यादी अंघोळ करतानाचे व खासगी व्हिडिओ चित्रीकरण करुन ते व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक गोरे तपास करीत आहेत.