Pune Crime News | मी इथला भाई आहे, दर महिन्याला 6 हजार हप्ता दे, नाही तर सामान विकून पैसे घेणार, चिखलवाडीत गुंडाने खंडणी मागून कार, मोटारसायकलच्या फोडल्या काचा

Pune Crime News | I am a brother from here, pay 6 thousand installments every month, otherwise I will sell the goods and get the money, in Chikhalwadi, a goon broke the glass of a car, a motorcycle and demanded ransom

पुणे : Pune Crime News | मी इथला भाई आहे, दर महिन्याला ६ हजार रुपये हप्ता दे, नाहीतर इथले सामान विकून पैसे घेणार, असे म्हणून लोखंडी अँगल चोरुन नेणार्‍या गुंडाला प्रतिकार केल्याने त्याने कार व दोन मोटारसायकलच्या काचा फोडल्या. यावेळी गुंडाच्या पायात काच घुसून तो जखमी झाला आहे.

याबाबत राज राजन निरभवणे (वय २६, रा. सनशाईन ग्रीन्स सोसायटी, चिखलवाडी, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अरमान अमीर शेख Arman Amir Shaikh (वय २०, रा. चिखलवाडी, बोपोडी) आणि त्याचा साथीदार जोएद ऊर्फ जब्बा (वय २१, रा. चिखलवाडी, बोपोडी) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चिखलवाडी येथील दिव्यांश मेडिकलसमोर ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज निरभवणे हे सिक्युरिटीचे कंत्राट घेतात. त्याच्याकडे काम करणार्‍या विवेक कांबळे याच्यासोबत जात असताना फिर्यादी यांचे काम चालू असलेल्या ठिकाणावरुन अरमान शेख हा लोखंडी अँगल घेऊन जाताना दिसल्याने त्यांनी त्याला थांबविले. लोखंडी अँगल का घेऊन चालला आहे, असे विचारल्यावर त्याने ‘‘तू आम्हाला कस काय थांबु शकतो, तु मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे, तु दर महिन्याला ६ हजार रुपये दे, जमत नसेल तर मी तुझ्या सर्व वस्तु विकून पैसे घेणार,’’ असे तो म्हणाला.

त्यावर मी कशासाठी द्यायचे असे विचारले. तेव्हा अरमान याने तुला तुझ्या व तुझ्या कामगाराची जीवाची पर्वा नसेल, तर दर महिन्याला पैसे द्यावेच लागतील, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी त्याला स्पष्ट नकार दिला असता त्याचा राग येऊन अरमान व जोएद यांनी हातात दगड घेऊन फिर्यादी व विवेक कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांची कार व दोन मोटारसायकल खाली पाडुन दगडाने काचा फोडून नुकसान केले. त्यात गाडीची काच लागून आरमान शेख हा जखमी झाला.

याविरोधात अरमान शेख याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राज राजन निरभवणे Raj Rajan Nirbhavne (वय २६, रा. चिखलवाडी, बोपोडी) आणि विवेक विकास कांबळे (वय २४, रा. गवळीवाडा, खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरमान शेख याला मित्राने बोलविल्याने त्याचे खडकी रेल्वे स्टेशन येथे सिक्युरिटी गार्ड ड्युटीवर तो गेला होता. तेथे असलेल्या राज निरभवने व विवेक कांबळे यांनी त्याला तू येथे काय काम करतो, असे म्हणाल्याने फिर्यादी हे घरी जात असताना त्यांनी फिर्यादी यांना तुला भांडणे करायचे काय असे म्हणून आरमान शेख याला खाली पाडून त्याच्या छातीवर पाय ठेवून कांबळे याने हातातील लोखंडी हत्याराने त्याला मारत असताना फिर्यादी याने पाय वर केल्याने डाव्या पायाचे टाचेजवळ जखम झाली. त्यानंतर ते घरी जात असताना पुन्हा सनसाईन सोसायटीचे पार्किंगमध्ये त्याला पकडले. राज निरभवने याने मोबाईलवर शुटिंग केले. कांबळे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस हवालदार भुजबळ तपास करीत आहेत.

You may have missed