Pune Crime News | ‘‘मी डॉन आहे, मी बाप आहे’’तडीपार असताना रामनवमीला शहरात येऊन डायलॉगबाजी करणार्‍या गुंडाला खराडी पोलिसांनी दाखवून दिले ‘‘कोण बाप आहे’’

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  तडीपार असताना रामनवमीच्या दिवशी पुणे शहरात येऊन ‘मी डॉन आहे, मी बाप आहे’, अशी डायलॉगबाजी करणार्‍या गुंडाला खराडी पोलिसांनी ‘‘नेमका बाप कोण आहे’’, हे दाखवून दिले.

https://www.instagram.com/reel/DWs0EbBiXuP/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

निखील मधुकर कांबळे Nikhil Mudhukar Kamble (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. निखील कांबळे याच्यावर ९ गंभीर गुन्हे आहेत. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी त्याला पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. असे असताना कांबळे हा त्याचे साथीदारांसोबत खराडीतील रक्षकनगर भागात २८ मार्च रोजी सायंकाळी आला होता. या भागातील गोल्ड सोसायटीसमोर कांबळे व त्याच्याबरोबर असलेल्या ८ ते १० साथीदारांनी दहशत माजविली.

कांबळे याने दहशत माजविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खराडी पोलिसांनी निखिल कांबळे याच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्याच्या सहकार्‍यांनी या आरोपींचा शोध घेऊन निखिल कांबळे, सुदेश रुपेश गायकवाड, अनुज मोरे, चावरे अशा चौघांना अटक केली. सुदेश गायकवाड याच्यावर ६ गुन्हे दाखल आहेत. त्यांनी ज्या भागात दहशत माजविली होती. त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी या चौघांना गुडघ्यावर बसवुन वरात काढली. पोलिसांना नडले तर काय होते, दहशत माजविल्यावर पोलिसांची अ‍ॅक्शन काय असते हे दाखवुन दिले.

You may have missed