Pune Crime News | शहरात अवैध धंदे लपून छापून सुरूच? पुण्यातील मटका किंग नंदू नाईकच्या अड्यावर पोलिसांचा छापा; 8 जणांना अटक, 2 लाखांचा ऐवज जप्त

Mataka

पुणे : Pune Crime News | पुण्यातील मटका किंग नंदू नाईक (Nandu Naik) याच्या शिवाजी रोडवरील (Shivaji Road Pune) जनसेवा बिल्डिंगमधील अड्यावर छापा टाकून ८ जणांना अटक केली आहे (Pune Crime Branch). त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साधनांसह २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी अनेकदा छापे घातल्यानंतरही काही दिवसांनी नंदू नाईकचे हे मटका अड्डे पुन्हा सुरु असल्याचे दिसून येते. (Pune Crime Branch Raid On Gambling Den)

याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस हवालदार त्रिंबक बामगुडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष लक्ष्मण गुजर (वय ५२, र. शिवाजीनगर गावठाण), रवींद्र धोंडिबा गजदाणे (वय ४२, रा. पिरंगुट), गोविंद अनंतराव वेदपाठक (वय ४३, रा. सासवड), राजू बबनराव गोरे (वय ३२, रा. पिरंगुट), किसन दत्तात्रय तावरे (वय ४३, रा. पिरंगुट), रोहन किसन तावरे (वय १९, रा. धाराशिव), निलेश कृष्णाजी रणपिसे (वय ५२,रा. सांगवी), नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७६, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार नाईक हा मटका किंग (Mataka King Nandu Naik) म्हणून ओळखला जातो. त्याचे शहरात अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे सुरु असतात. शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालयाचे मागील जागेत मटका अड्डा सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट १ व युनिट २ च्या अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने येथे छापा घातला. तेव्हा तेथे कल्याण ओपन मटका जुगाराच्या चिठ्ठया दिल्या जात होत्या. त्यांच्याकडून मोबाईल, ९५ हजार ७४० रुपये रोख, जुगाराची साधने असा २ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम (PSI Harshal Kadam) तपास करीत आहेत. (Pune Police Raid On Mataka Adda)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Anjali Damania On Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात आज मोठा गौप्यस्फोट! अंजली दमानिया म्हणाल्या – अजित पवारांकडे इतका पैसा येतो कुठून?

Maharashtra Assembly Election 2024 | आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार, महायुती की मविआ? ओपिनियन पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

You may have missed