Pune Crime News | मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या स्पावर अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाचा छापा, स्पा मॅनेजर महिलेला अटक
पुणे : Pune Crime News | बंडगार्डन येथील मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या स्पावर अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकून २ महिलांची सुटका केली. स्पा मॅनेजर महिलेला अटक केली आहे.
प्रिती ऋषिकेश नायर (वय २१, रा. एकतानगर, गोखलेनगर) असे अटक केलेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे.
याबाबत पोलीस हवालदार ईश्वर म्हातारदेव आंधळे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई ढोले पाटील रोडवरील सिद्धार्थ कोर्ट इमारतीतील तळमजला व पहिल्या मजल्यावरील किन्नारी सलुन अँड स्पा वर २६ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता करण्यात आली.
ढोले पाटील रोडवरील किन्नरी सलुन अँड स्पा येथे मसाजच्या नावाखाली महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याबाबतची गोपनीय बातमी अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली. पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून बातमीची पडताळणी करण्यात आली. बनावट ग्राहकाने इशारा केल्यावर पोलिसांनी किन्नरी सलुन अँड स्पा या मसाज सेंटरवर छापा टाकला. त्यात स्पा मॅनेजर महिला दोन तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेत असल्याचे आढळून आले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन प्रिती नायर हिला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस हवालदार ईश्वर आंधळे, भिवरकर, जाधव, महिला पोलीस अंमलदार कंक व इंगळे यांनी केली आहे.
