Pune Crime News | खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर जप्त केलेल्या 5 कोटी रुपयांच्या प्रकरणात महत्वाचा पुरावा हाती; आज निवडणुक आयोग घेणार तपासाचा आढावा, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 20 कोटींची रोकड जप्त
पुणे : Pune Crime News | खेड शिवापूर (Khed Shivapur Toll Naka) येथील टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) एका कारवाईत ५ कोटी रुपयांची रोकड पकडली होती. या कारवाईला तब्बल २७ दिवस उलटून गेल्यानंतरही अजून त्याचा तपास पूर्ण झाला नसून हे पैसे नक्की कोणाचे आणि कशासाठी नेले जात होते, याचा उलघडा लागला नाही. असे असेल तरी त्याबाबत काही महत्वाचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत. त्यातील काही महत्वाचे पुरावे अद्याप पुढे येणे बाकी असल्याचे आयकर विभागाकडून (Income Tax Dept) सांगण्यात येत आहे. दरम्यान, निवडणुक आयोग या ५ कोटी रुपयांच्या तपासाचा आज आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. त्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी आयकर विभाग व निवडणुक आयोगाला कळविली आहे. आयकर विभाग याबाबत अधिक तपास करत आहे. निवडणुक आयोगही या तपासावर देखरेख करीत आहेत.
ही रक्कम सत्ताधारी पक्षातील एका आमदाराची असून जप्त केलेली गाडीही त्यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते. परंतु, याचा तपास आयकर विभागाकडे गेल्यानंतर ते याबाबत काहीही बोलायला तयार नाही.
पेट्रोल पंप, किराणा दुकानदार यांच्याकडे मोठी रोख रक्कम आढळून आली तर ते ग्राहकांनी दिली असल्याचे सांगतात. पण अशी रक्कम त्याच शहरातील बँकेमध्ये त्यांनी भरणे आवश्यक असते. एका शहरातून दुसर्या शहरात वैयक्तिकरित्या कोणालाही २ लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड घेऊन जाता येत नाही. असे असताना इतकी मोठी रोकड कशी घेऊन जात होते.
ही ५ कोटींची रक्कम जप्त केल्यानंतर दोन दिवसांनी पुण्यात १३८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने पकडण्यात आले होते. त्याबाबत सराफांनी त्याचा व्यवहार व पावत्या सादर केल्यानंतर आयकर विभागाने हे सोन्याचे दागिने संबंधितांना परत केले. मग या रोख रक्कमेचा मुळ मालक कोण? ते कशासाठी घेऊन जात होते? याबाबत अजून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.
या रोख रक्कमेबाबत आयकर विभागाला काही लिंक्स मिळाल्या आहेत. मात्र, अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी आणखी काही महत्वाची माहिती पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे आयकर विभागाचे म्हणणे आहे.
पुणे व इतर ठिकाणी पकडण्यात आलेल्या रोख रक्कमेबाबत निवडणुक आयोगाकडून आज तपासाबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे. आयकर विभागाने एखादी रक्कम पकडल्यानंतर त्याबाबतची तपास करण्यासाठी २ महिन्यांची मुदत असते. त्या काळात त्या रक्कमेवर ज्यांची मालकी आहे त्यांनी योग्य पुराव्यासह दावा करावा लागतो. आयकर विभाग हा पुरावा तपासून तो योग्य वाटल्यास पैसे परत केले जातात. जर कोणी दावा केला नाही तर ते शासनजमा होतात.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या २० कोटी रुपयांचा तपास आयकर विभागाच्या नियमानुसार करायचा झाला तर या रक्कमा नेमक्या कोणाच्या होत्या, हे २० नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच मतदान होईपर्यंत नक्की होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही..
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”