Pune Crime News | मॉनिग वॉकला जाणार्या महिलांचे मंगळसुत्र हिसकाविणार्या अट्टल चोरट्यास केले जेरबंद; अलंकार पोलिसांची कामगिरी
पुणे : मॉनिग वॉकला जाणार्या महिलांचे गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेणार्या अट्टल चोरट्याला अलंकार पोलिसांनी (Alankar Police Station) पकडले. अक्षय गणपती तोडकर (वय २३, रा. दत्तवाडी मुळ करंबळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. (Chain Snatcher Arrested)
मंगळसुत्र चोरीची घटना २६ ऑगस्ट रोजी सकाळी घडली होती. मॉनिग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेण्यात आले होते. त्याअनुषगाने तपास करताना सीसीटीव्हीमध्ये एक स्प्लेंडर मोटारसायकलवरुन चोरटा जाताना दिसून आला होता. तपास पथक त्याचा शोध घेत असताना डी पी रोडवर सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलेला तरुण दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची चैन, मोबाईल व मोटारसायकल असा १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Sambhaji Kadam DCP), सहायक पोलीस आयुक्त अजय परमार (Ajay Parmar ACP), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे (Sunita Rokde PI) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित काळे (PSI Abhijit Kale), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश निंबाळकर (Mahesh Nimbalkar), पोलीसअंमलदार पवार, यादव, सपकाळ, कुंभार, राठोड, शिंदे, शिवडकर यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण