Pune Crime News | रेल्वे प्रवाशांचे दागिने चोरुन नेणार्‍या आंतरराज्य टोळीला अटक करुन 40 लाखांचे सोने, हिरे जडीत 288 ग्रॅमचे दागिने दिल्लीहून हस्तगत

Pune Crime News | Inter-state gang involved in stealing jewellery from railway passengers arrested, 288 grams of gold, diamond-studded jewellery worth Rs 40 lakh seized from Delhi

पुणे : Pune Crime News | रेल्वे प्रवाशांना उतरण्यास मदत करण्याचा बहाणा करुन त्यांच्या बॅगेतील दागिने काढून घेणार्‍या आंतरराज्य टोळीला पुणे रेल्वे पोलिसांनी हरियाणातील टोळीतील ५ जणांना दिल्लीतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४० लाख रुपयांचा सोने व हिरेजडीत २८८ ग्रॅमचे दागिने जप्त केले आहेत.

मोनू राजकुमार (वय २५, रा. कुगंर, ता. बुवानीखेड, जि. भिवानी, हरियाना), हवासिंग फत्तेसिंग (वय ६६, रा. धोडी, ता. जुलाना, जि. जिंद), अमित कुमार बलवंत सिंग (वय ३१, रा. कुुंगड, ता. बवानी खेडा, जि. भवानी), अजय सतीश कुमार (वय २८, रा. मनोहरपूर, ता. जि. जिंद), कुलदीप रामफळ (वय २८, रा. लोचब, ता. खुंगाकुट्टी, जि. जिंद) अशी अटक केलेल्यांची नावे असून ते सर्व जण हरियाना राज्यातील राहणारे आहेत.

गांधीधाम -बंगलोर एक्सप्रेसने सुरत ते मिरज असा प्रवास एक कुटुंब करत होते. मिरज रेल्वे स्टेशन जवळ आल्यावर महिला सीटखाली ठेवलेल्या बॅगा बाहेर काढून बोगीच्या दरवाज्याजवळ घेऊन जात असताना दरवाज्याजवळ असलेल्या ५ पुरुषांपैकी तिघांनी सामान असलेल्या बॅगा मिरज रेल्वे स्टेशन येथे उतरविण्यास मदत करतो, असे सांगितले. त्यांच्या बॅगा स्टेशनवर उतरविण्यास मदत केली. मदतीच्या बहाण्याने त्यांनी बॅगेतील सोन्याचे, हिरेजडीत असे २४ तोळ्याचे दागिने चोरुन नेले.

पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज लोहमार्ग पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी करत होते. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी हे हरियानातील आंतरराज्य टोळीचे असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणातून हे आरोपी विमानाने दिल्ली येथे गेल्याचे समजले. दिल्ली विमानतळ अ‍ॅथोरेटी व दिल्ली क्राईम ब्रँच यांच्या मदतीने दिल्लीत ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन ९ दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. त्यात मिरज पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यातील एकूण २८८ ग्रॅम सोन्याचे व हिरेजडित दागिने हस्तगत करण्यात आले.

पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सांगितले की, रेल्वे स्टेशनजवळ आल्यानंतर विशेषत: महिला प्रवासी दरवाज्याजवळ आपल्या बॅगा घेऊन येत असताना त्यांना बॅगा उचलण्यास मदत करण्याचे बहाण्याने आरोपी व त्यांचे साथीदार प्रवासी यांची बॅग दरवाज्याजवळ घेऊन येत असताना बॅगा उचलण्यास मदत करण्याचे बहाण्याने चोरटे प्रवासीची बॅग दरवाज्याजवळ घेऊन प्रवासीची नजर चुकवुन बॅगची चैन उघडून हाताला लागेल, त्यामधील मौल्यवान ऐवज चोरुन बॅगची चैन आहे, तशी लावुन ठेवतात. तरी रेल्वेमधील प्रवासी यांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवता आपले बॅग अनोळखी व्यक्तींना उचलण्यास मदतीसाठी देऊ नयेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्गचे प्रभारी अधिकारी बाळासाहेब अंतरकर, मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी सुभाष मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे, रुपाली गोरड, पोलीस उपनिरीक्षक सुनिल माने, धनंजय चव्हाण, आर बी पाटील, पोलीस हवालदार दीपक ठोंबरे, मोसीन पटेल, तैफिक पटेल, अमर सावंत, इब्राहिम अरभावी, पंकज आवळे, संतोष जगताप, अमित गवारी, पोलीस अंमलदार अन्सार मुजावर, आर पी एफ जवान उपनिरीक्षक डी एस लाड, सहायक उपनिरीक्षक विशाल मोरे, सह उपनिरीक्षक आण्णासाहेब पारखे, पोलीस अंमलदार युवराज गायकवाड यांनी केली आहे.

You may have missed