Pune Crime News | विजयस्तंभाला अभिवादनासाठी येणार्या महिलांचे मंगळसुत्र चोरणारी आंतराज्य टोळी जेरबंद, 6 गुन्हे उघडकीस, 20 लाखांचा ऐवज जप्त
पुणे : Pune Crime News | कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी रोजी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. अशा गर्दीत महिलांचे मंगळसुत्र चोरणार्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने बीडमधून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आणले असून २० लाख ४ हजार रुपयांचे १६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
सुभाष चंद्रकांत जाधव Subhash Chandrakant Jadhav (वय ३९, रा. शिरापूर धुमाळ, ता. शिरुर, जि. बीड व कालिकानगर, जि. बीड), लहु संतराम गायकवाड Blood Santram Gaikwad (वय ३०, रा. रायमोह, ता. शिरुर, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
१ जानेवारी रोजी कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणार्या भाविकांच्या बंदोबस्ताबाबत सध्या नियोजन बैठका सुरु आहे. त्याचवेळी गेल्या वर्षी गर्दीमधून काही महिलांचे मंगळसुत्र चोरीला गेले होते. त्याचे गुन्हे अद्याप उघडकीस आले नव्हते. हे गुन्हे उघडकीस आणून गर्दीच्या ठिकाणी होणार्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिला होता. त्या अनुषंगाने युनिट ६ चे पथक अशा प्रकारचे गुन्हे करणार्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.
सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार काशिनाथ कारखेले, नितीन मुंडे, साळवे, ताकवणे, व्यवहारे या पथकाने सातत्याने गोपनीय माहिती प्राप्त करुन युनिट ६ च्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचे संकलन केले. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सुभाष जाधव व लहु गायकवाड यांना बीड येथून १८ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात लोणीकंदमधील जानेवारी २०२५ मधील २ गुन्हे, वाघोली,लोणी काळभोर, स्वारगेटमधील प्रत्येकी एक गुन्हा तसेच हडपसरमधील २०२४ मधील एक गुन्हा असे ६ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. त्यांच्याकडून २० लाख ४ हजार रुपयांचे १६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, सारग दळे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.
