Pune Crime News | हिंजवडीमध्ये भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटले; घटना CCTV त कैद
हिंजवडी: भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून हिंजवडीमध्ये ज्वेलर्सला लुटण्यात आले आहे. हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात शुक्रवार (दि.२) सकाळी १० वाजताच्या सुमारास तीन चोरटे शिरले, त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. घटनेनंतर हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हिंजवडीमध्ये आज सकाळी शिवमुद्रा ज्वेलर्स नावाच्या दुकानात पिस्तूलाचा धाक दाखवून सोने- चांदीचे दागिने लुटण्यात आले आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्वेलर्सच्या दुकानात तिघे जण शिरल्यानंतर त्यापैकी एकाने दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवला. हुज्जत घालण्यात आली, दुकानदाराला धक्काबुक्की करण्यात आली. मग सोने- चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. (Pune Crime News)
पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे.
अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीने दिवसभर व्यस्त असलेल्या लक्ष्मी चौकात (Laxmi Chowk Hinjewadi)
भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा