Pune Crime News | गोळी न उडाल्याने पिस्टल डोक्यात मारुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या फरार गुन्हेगाराला पकडून खडक पोलिसांनी 2 गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस केले जप्त

Pune Crime News | Khadak police arrested a fugitive criminal who attempted murder by shooting himself in the head with a pistol when the bullet did not fire, seized 2 village pistols, a live cartridge

पुणे : Pune Crime News | पूर्व वैमनस्यातून वज्र मारुती मंडळाजवळ मारुती जन्मोत्सवाचे फलक लावणार्‍या तरुणावर पिस्टल रोखून फायर केले. परंतु, गोळी न उडाल्याने पिस्टल डोक्यात मारुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगाराला खडक पोलिसांनी पकडून त्याच्याकडून २ गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.

सुलतान युसूफ सय्यद Sultan Yusuf Syed (वय २५, रा. अप्पर राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

याबाबत स्वप्नील सुनिल पाटणकर (वय २२, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजता घडली होती. फिर्यादी व त्यांचे मित्र वज्र मारुती मंडळाचे फलक लावत होते. त्यावेळी पूर्ववैमनस्यातून अनिश धडे, ओम लोंढे, सुलतान युसुफ सय्यद, चैतन्य शिवपालक, मितेश विनोद माने, सार्थक गावडे, वरद महेंद्र कांबळे, वास्को कांबळे हे तेथे आले. अनिश धडे याने स्वप्नील कडे बोट दाखवून हाच तो स्वप्नील पाटणकर असे सांगितले. सुलतान सय्यद याने त्याच्याकडील पिस्टल रोखून फायर केले.

परंतु, पिस्टलातून गोळी उडाली नाही. तेव्हा त्याने पिस्टलच्या उलट्या लोखंडी बाजूने स्वप्नील पाटणकर यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्याच्या इतर साथीदारांनी स्वप्नील पाटणकर यांच्या मित्रांना मारहाण केली होती. यातील काही गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु, पिस्टल रोखणारा सुलतान सय्यद गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे व त्यांचे सहकारी सुलतान सय्यद याचा शोध घेत होते. पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना खास बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सुलतान सय्यद हा शुक्रवार पेठेतील साठे कॉलनीमध्ये आला आहे. या बातमीच्या अनुषंगाने तपास पथक साठे कॉलनीत गेले. तेथे थांबलेल्या सुलतान सय्यद याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ९१ हजार रुपयांचे २ गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, संजय करनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, विकास पांडळे, निलेश दिवटे, शुभम केदारी, दिनेश गायकवाड, विश्वजीत गोरे, पांडुरंग चंदेल यांनी केली आहे.

You may have missed