Pune Crime News | कोंढवा: उंड्रीमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा नायजेरियनांकडून 7 लाखांचे कोकेन, एम डी अंमली पदार्थ जप्त
पुणे : Pune Crime News | उंड्री येथे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा नायजेरियन नागरिकांना पकडून त्यांच्याकडून कोकेन व एम डी असा ७ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)
मायकल इंडीसर जॉन (वय ३५, रा. बंकर सफायर सोसायटी, पिसोळी) आणि फिलीप विल्यम इडेली (वय ४९, रा. बंकर सफायर सोसायटी, पिसोळी) अशी या नायजेरियन नागरिकांची नावे आहेत. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी (Anti Narcotics Cell Pune) पथकाचे पोलीस शिपाई योगेश मांढरे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने विशेष मोहिमे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड (PI Sudarshan Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक (API Nitinkumar Naik), पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुले (PSI Shivaji Ghule) व त्यांचे सहकारी २२ ऑगस्ट रोजी रात्री गस्त घालत होते. यावेळी उंड्री रोडवर मोकळ्या जागेत दोन परदेशी नागरिक दुचाकीवर थांबलेले दिसले.
पोलिसांनी आडबाजूला थांबुन त्यांच्यावर पाळत ठेवली. ते विनाकारण थांबून इकडे तिकडे पहात होते. त्यांच्याविषयी संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्या अंगझडतीत फिलीप यांच्याकडे ३ लाख रुपयांचे १५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) व मायकल याच्याकडे ३ लाख २० हजार रुपयांचे १६ ग्रॅम कोकेन मिळवून आले. त्यांच्याकडील मोबाईल, दुचाकी असा ७ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा