Pune Crime News | एमजी रोडवरील दुकाने फोडणार्या 3 अल्पवयीन मुलांसह चौघांकडून लष्कर पोलिसांनी 3 गुन्हे उघडकीस आणून 3 लाखांचा माल केला जप्त
पुणे : Pune Crime News | लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील कपड्याच्या दुकानाचा दरवाजा उचकटून महागडे कपडे व इतर वस्तुंची चोरी करणार्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला लष्कर पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यांच्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
निर्मल सोनार (वय १८, रा़ नेपाळ) असे या अटक आरोपीचे नाव आहे.
लष्कर भागातील एम जी रोडवरील मेड फॉर मेन या कपड्याच्या दुकानातून ५८ हजार रुपयांचे महागड्या कपड्यांची चोरी झाली होती. त्याची ५ जानेवारी २०२६ रोजी फिर्याद दाखल झाली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. पोलीस अंमलदारांनी त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन निर्मल सोनार व त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ३ दुकानातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी व इतर गुन्ह्यात चोरी केलेला एक लॅपटॉप, ए सी मध्ये वापरली जाणारी तांब्याचे पाईप, कटावणी, चोरी केलेल्या कपड्यासह एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त संगिता शिंदे अल्फांसो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे, देशमुख, पोलीस अंमलदार महेश कदम, अतुल मेगे, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडिलकर यांनी केली आहे.
