Pune Crime News | यल्लमा देवीचा चांदीचा मुकुट चोरणार्‍या चोरट्याला लक्ष्मीनगर पोलसिांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime News | Laxminagar Police arrest thief who stole Yalla Devi's silver crown

पुणे : Pune Crime News | येरवडा परिसरातील यल्लमा देवीचा दीड किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरुन नेणार्‍या चोरट्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

शिवराम पापा काळे Shivram Papa Kale (वय ४७, रा. सुरक्षानगर, येरवडा) असे या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत राजेश पुरण परदेशी (वय ५०, रा. शास्त्रीनगर, येरवडा) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते यल्लमादेवी मंदिराच्या परिसरात रहातात. परदेशी हे रिक्षाचालक आहेत. त्यांचे गुरु रवी शिंदे हे दररोज यल्लमा देवीची पुजा करतात. त्यांनी सर्वांनी मिळून १० वर्षांपूर्वी सव्वा दोन लाख रुपये खर्च करुन दीड किलो चांदीचा मुकुट यल्लमा देवीला केला होता. १६ फेब्रुवारी रोजी ते नेहमीप्रमाणे रात्री साडेअकरा वाजता पुजा करुन सर्व जण झोपी गेले होते. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे ते कामाला गेले. सायंकाळी रवि शिंदे यांनी पाहिले की देवीचा चांदीचा मुकुट कोणीतरी चोरी करुन नेला होता.

लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास सुरु केला. आरोपीबाबत कोणतीही माहिती नसताना व घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बंद होते. पोलीस अंमलदार गायकवाड, शेख व जाधव यांनी तांत्रिक विश्लेषण व इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तसेच मिळालेल्या माहितीवरुन सापळा रचून शिवराम काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करुन त्याच्याकडून यल्लमा देवीची चांदीची एकूण ७०० ग्रॅम वजनाचा १ लाख ८४ हजार रुपयांचा मुकुट हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार गायकवाड, वायाल, शेख, कांबळे, ओंबासे, जाधव, शिंदे, परदेशी यांनी केली आहे.

You may have missed