Pune Crime News | गुटखा वाहतूक करणार्‍या दोघांना पकडून लक्ष्मीनगर पोलिसांनी जप्त केला 20 लाखांचा गुटखा

Pune Crime News | Laxminagar Police arrest two people involved in Gutkha smuggling, seize Gutkha worth 20 lakhs

पुणे : Pune Crime News | आंबेडकर चौकाकडून संगमवाडीच्या दिशेने जाणार्‍या पिकअप गाडीला लक्ष्मीनगर पोलिसांनी पकडून त्यातून २० लाख ५३ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

दुर्देश मोहनलाल जाट (वय १९, रा. रामनगर येरवडा) आणि त्याचा साथीदार जगदिश वाघराम जाट (वय २८, रा. ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार भिमराव कांबळे, अमोल गायकवाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोघे जण पिकअप गाडीतून गुटखा वाहतूक करणार आहेत. ते आंबेडकर चौकाकडून संगमवाडीच्या दिशेने जाणार आहे. या माहितीनुसार लक्ष्मीनगर पोलिसांनी येरवडा फायर ब्रिगेड दर्गा चौक येथे सापळा रचला. बातमीप्रमाणे आंबेडकर चौकाकडून येणारी महिंद्रा पिकअप गाडी पोलिसांनी अडविली. दोघांना ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली. तेव्हा त्यात गुटखा आढळून आला. पोलिसांनी गाडीसह २० लाख ५३ हजार ८१५ रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, मिथुन सावंत, पोलीस अंमलदार भिमराव कांबळे, अमोल गायकवाड, वाघुले, गद्दे, चव्हाण, शिंदे यांनी केली आहे.

You may have missed