Pune Crime News | कागदपत्रे पाहताना लेफ्टनंट कर्नल यांच्या नजरेने त्यांना हेरले; बॉर्डर रोड संघटनेच्या चालक पदाच्या लेखी परीक्षेला दुसर्‍यांदा बसणार्‍या दोघा उमेदवारांवर गुन्हा दाखल

fraud (1)

पुणे : Pune Crime News |  बॉर्डर रोड संघटनेच्या चालक पदासाठी सुरु असलेल्या लेखी परिक्षेला दुसर्‍यांदा आलेल्या उमेदवारांना लेफ्टनंट कर्नल यांच्या बारीक नजरेने हेरले आणि अगोदर बसलेले असताना पुन्हा दुसर्‍याच्या नावावर परीक्षा देण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघा तोतया उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनीत गोपाल सन ऑफ प्राण नाथ सिंह Navneet Gopal son of Pran Nath Singh (रा. फतेहपूर, अतिबल पो. रजला, फतेहपूर, अटवाल, मुजफ्फरपूर, बिहार) आणि अजय दिलबाग सिंग Ajay Dilbag Singh (वय २४, रा. सुदकेन कलण,ता. जि. जिंद, हरियाना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत लेफ्टनंट कर्नल पी अरविंद यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी रोडवरील भैरवनगर येथील ग्रेफ सेंटर बी आर ओ येथे चालक पदासाठी १ डिसेंबरपासून सध्या भरती प्रक्रिया सुरु आहे. चालक पदासाठी देशभरातून सुमारे १२०० उमेदवार लेखी परीक्षेसाठी आले होते. त्यांची परीक्षा १ डिसेंबरपासून घेतली जात आहे. ५ डिसेंबर रोजी अरविंद हे उमेदवारांचे ओळख पत्र पाहून खात्री करुन त्यांना परीक्षेसाठी रुममध्ये पाठवत होते. त्यावेळी नवनीत गोपाल हा लेखी परीक्षेसाठी आला. त्याच्या परीक्षेचे कागदपत्रे चेक करत असताना हा उमेदवार यापूर्वी १ डिसेंबर रोजी परीक्षेला आल्याची त्यांना शंका आली. त्यांनी त्याला बाजूला घेऊन १ डिसेंबर रोजीचे व्हिडिओ फुटेज पाहिले. तेव्हा १ डिसेंबर रोजी त्याने सचिन कुमार नावाच्या उमेदवाराच्या नावाने परीक्षा दिली होती. एकच उमेदवार दोन वेहा परीक्षा देत असल्याची त्यांना खात्री झाल्याने त्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन नवनीत गोपाल याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दुसरा प्रकार ६ डिसेंबर रोजी समोर आला. याबाबत असिस्टंट इंजिनिअर अविनाश गणेश केसकर (वय५९, रा. दिघी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अजय दिलबाग सिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अजय दिलबाग सिंग याने ३ डिसेंबर रोजी लेखी परीक्षा दिली असता ६ डिसेंबर रोजी तो पुन्हा परीक्षा देण्यासाठी आला. दुसर्‍यांदा लेखी परीक्षा देण्यासाठी आल्याचे व्हिडिओद्वारे खात्री झाली. आज प्रविणकुमार याची परीक्षा असताना त्याच्या नावावर उमेदवार म्हणून अजय दिलबाग सिंग हा फसवणुक करुन परीक्षा देण्यासाठी आला होता.  पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख तपास करीत आहेत.